🌟गंगाखेड येथील धनगर समाजातील रणरागिणी सौ.सिमाताई घनवटे यांचा डॉ.रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळात जाहीर प्रवेश....!


🌟राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला आघाडी तालुकाध्यक्षा सिमाताई घनवटे यांनी आ.गुट्टेंच्या उपस्थितीत केला प्रवेश🌟 

गंगाखेड (दि.१० नोव्हेंबर २०२४) :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजातील रणरागिणी युवा नेत्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या गंगाखेड तालुकाध्यक्षा व वाघलगावच्या माजी सरपंच सौ.सिमाताई नारायणराव घनवटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत डॉ रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.

गंगाखेड तालुक्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून सौ.सिमाताई घनवट यांनी महिलांचे मोठे संघटन उभारले आहे अशा महिलांच्या नेतृत्व चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या वाघलगावच्या माजी सरपंच सौ‌.सीमाताई नारायण घनवटे यांनी गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आमदार रत्नाकरर गुट्टे काका यांच्या विकास कामाचा धडाका पाहून काल शनिवार दि.०९ नोव्हेंबर २०२४ रोजी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळामध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या