🌟पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा....!


🌟यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन केले🌟


पुर्णा (दि.२७ नोव्हेंबर २०२४) - पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या हस्ते संविधानाचे निर्माते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व संविधान ग्रंथास पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन केले.

या कार्यक्रम प्रसंगी गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. भीमराव मानकरे, प्रा.डॉ. भारत चापके,प्रा.डॉ. संतोष कुऱ्हे,प्रा.डॉ.विजय भोपाळे, प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी, प्रा.डॉ.मारोती भोसले, प्रा.डॉ.प्रभाकर किर्तनकार,प्रा.डॉ.सुरेखा भोसले,प्रा.डॉ.शारदा बंडे,प्रा.डॉ.दीपमाला पाटोदे,प्रा.वैशाली लोणे,प्रा.सुरेश पवार,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेक्षक प्रा.दता पवार,वरिष्ठ लिपिक सूर्यकांत भोसले,दत्ता कदम,ज्ञानोबा मुळे, महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा‌.डॉ.प्रभाकर सूर्यवंशी यांनी यांनी केले तर आभार  प्रा. डॉ . संजय कसाब यांनी मानले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या