🌟परभणी जिल्ह्याने वर्षानूवर्ष शिवसेनेच्या प्रखर हिदुत्वास कौल दिला : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भगवाच फडकवा....!


🌟शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे जनतेला आवाहन : उध्दव ठाकरे यांच्यावर खासदार शिंदेंनी केली परखड टिका🌟

परभणी (दि.१५ नोव्हेंबर २०२४) : परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्याने वर्षानूवर्ष शिवसेना व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिदुत्वास कौल दिला आहे त्यामुळेच या निवडणूकीतसुध्दा सर्वसामान्य मतदारांनी धनुष्यबाणाचे बटण दाबून हिंदुत्वाच्या या बालेकिल्ल्यावर पुन्हा एकदा भगवा फडकवावा असे आवाहन शिवसेना नेते खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

              महायुतीचे अधिकृत शिवसेना उमेदवार आनंद शेषेराव भरोसे यांच्या निवडणूक प्रचारार्थ खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची आज शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील अन्नपूर्णा लॉन्सवर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी उमेदवार आनंद भरोसे,माजी खासदार अ‍ॅड.सुरेश जाधव पाटील, परभणीचे शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे,माजी जिल्हा प्रमुख राजू कापसे,प्रथम महापौर प्रताप देशमुख,माजी जिल्हाध्यक्ष भास्करराव लंगोटे,माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, युवासेनेचे आप्पाराव वावरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व्यासपीठावर विराजमान होते.

              आपल्या भाषणातून खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भूमिकांसह वाटचालीवर कडाडून हल्ला केला सत्ता आणि खूर्ची यासाठीच या व्यक्तीने गेल्या निवडणूकीच्या निकाला पाठोपाठ काँग्रेस जनांसमोर लोटांगण घातले पुढे शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हच काँग्रेसजणांकडे गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचा तो प्रयत्न हाणून पाडला असे नमूद केले. हिंदुर्‍हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि धनुष्यबाण या दोन गोष्टी जीवापाड जपल्या. परंतु त्यांचे सुपूत्र उध्दव ठाकरे यांनी वडीलांच्या पश्‍चात संपूर्ण सेनाच काँग्रेसच्या दावणीस बांधली लाचार होवून सातत्याने रंग बदलले पुढे धनुष्यबाण सुध्दा गहाण ठेवून हिंदुत्वास तिलांजली दिली.

              परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे होमपीच आहे. या जिल्ह्याने सातत्याने हिंदुत्वास कौल दिला आहे. या निवडणूकीतसुध्दा सामान्य जनता हिंदुत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भगवाच फडकेल व हिंदुत्व पूर्णतः विसरलेल्या ठाकरे गटास भानावर आणेल असा विश्‍वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला उध्दव ठाकरे यांच्या परभणी दौर्‍यातील सभेत हिंदुत्वाचा नामोल्लेखही झाला नाही हे बदलत्या रंगाचे द्योतक आहे असे स्पष्ट करतेवेळी खासदार शिंदे यांनी ठाकरे यांनीच शिवसेनेचे वाटोळे केले हिंदुर्‍हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांना तिलांजली दिली आणि आता काँग्रेसच्या दावणीला जुंपून हेच ठाकरे महायुतीवर टिका टिप्पणी करु लागले आहेत यातून ठाकरे यांची हास्यास्पद आणि लांछनास्पद भूमिका लक्षात येते असे शिंदे यांनी म्हटले.

              दरम्यान या सभेत उमेदवार आनंद भरोसे यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे झाली सभेस मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या