🌟यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव हे होते🌟
पुर्णा (दि.२६ नोव्हेंबर २०२४) - पुर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी येथील राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महविद्यालयात आज २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रस्तावनाचे वाचन घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रदीप कदम,बबन बगाटे गंगाधर सोनटक्के आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माध्यमिक शिक्षक देवानंद भारती यानीं संविधाननाचे महत्व विषद करून विद्यार्थ्यांनां माहीती दिली तर मयुरी खंदारे हिने भारतीय संविधान या विषयावर भाषण करून संविधान जागृती केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा उत्तम मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रा सतीश भालेराव, बबन पारवे प्रकाश महाजन,संदीप विश्वास, कानगुले , मारोती मुडें यानीं विशेष साह्य केले......
0 टिप्पण्या