🌟परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध....‌!

 


🌟जिल्ह्यात परभणी,पाथरी,जिंतूर,गंगाखेड हे चार विधानसभा मतदारसंघ🌟 

परभणी (दि.०९ नोव्हेंबर २०२४) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी परभणी जिल्ह्यातील परभणी,पाथरी,जिंतूर,गंगाखेड या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने मतदानासाठी राखीवसह कंट्रोल युनिट (सी.यू.), शबॅलेट युनिट (बी.यू.) आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

             जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी मतदानासाठी राखीवसह सी.यू.५२५,बी.यू.९६३ आणि व्हीव्हीपॅट ५६९,परभणी विधानसभा मतदारसंघासाठी मतदानासाठी राखीवसह सी.यू.४०५, बी.यू ४०५ आणि व्हीव्हीपॅट ४३९,गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी मतदानासाठी राखीवसह सी.यू.५१८,बी.यू ५१८ आणि व्हीव्हीपॅट ५६१ आणि पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी मतदानासाठी राखीवसह सी.यू. ४९८,बी.यू ४९८ आणि व्हीव्हीपॅट ५३९ देण्यात आलेले आहेत.

            दरम्यान, परभणी जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून जिंतूर विधानरसभा मतदारसंघामध्ये एकूण १७ उमेदवार, परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १५ उमेदवार, गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १२ उमेदवार आणि पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १४ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या