🌟परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राहुल पाटील यांचा मातंग समाजाच्या वतीने भव्य सत्कार संपन्न....!


🌟लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ गवारे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी :- परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहूल पाटील यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक साधली त्याबद्दल आज गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ गवारे आणि रोहिदास नेटके यांनी आमदार डॉ.राहुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांचा भव्य सत्कार केला. 

विधानसभा निवडणुकी दरम्यान गवारे यांनी आमदार डॉ.राहुल पाटील यांना मातंग समाजाचा पाठिंबा असल्याचं पत्र एका मोठ्या आयोजित कार्यक्रमात दिलं होतं, त्या अनुषंगाने मातंग समाजाने आमदार पाटील यांना एकमताने मतदान केलं, आणि आमदार डॉ. राहुल पाटील निवडेलून आले, म्हणून आमदार डॉ. राहुल पाटील यांचा सकल मातंग समाजाच्या वतीने लवकरच भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती विश्वनाथ गवारे यांनी दिली आहे.......  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या