🌟महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ राहूल पाटील विजयी तर महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे पुन्हा पराभूत🌟
परभणी (दि.२३ नोव्हेंबर २०२४) : परभणी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी तथा महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांचा ३४ हजार २१६ एवढ्या मताधिक्याने पराभव करीत विजयाची हॅट्रीक केली यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
या मतदारसंघात या दोघात तूल्यबळ लढत होईल, असे अपेक्षित होते. प्रचारयुध्दाच्या अंतीम टप्प्यापर्यंत तेच चित्र होते. मतदानाच्या पूर्वसंध्येस दोघाही प्रतिस्पर्ध्यांनी लक्ष्मीअस्त्राचा वापर केला. त्यामुळे मोठी चूरस होईल, असे चित्र दिसू लागले. परंतु, पाटील यांना परभणी शहरातून एकगठ्ठा मते पडतील, असे चित्र मतदानातून समोर आल्यानंतर पाटील यांचे पारडे जड दिसू लागले. अपेक्षेप्रमाणे घडलेसुध्दा तसेच.
मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाल्याबरोबर टपाली मतदानात भरोसे यांनी आघाडी मारली. पाठोपाठ पहिल्या फेरीपासूनसुध्दा सहाव्या फेरीपर्यंत आघाडी कायम राखली. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली असतांना सातव्या फेरीपासून पाटील यांनी जी आघाडी मारली ती निर्णायक अशा पंचवीसाच्या फेरीपर्यंत कायम राखली....
0 टिप्पण्या