🌟परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील खून प्रकरणातील आरोपीस ०३ दिवसांची पोलीस कोठडी.....!


🌟न्यायालयाने आरोपी लक्ष्मण पंडितराव शितळे याला दि.११ नोव्हेंबर पर्यंत सुनावणी पोलीस कोठडी🌟 

 परभणी (दि.०९ नोव्हेंबर २०२४) : परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील सचिन आडणे खून प्रकरणातील आरोपी लक्ष्मण पंडितराव शितळे याला काल शुक्रवार दि.०८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री पोलिसांनी अटक केली. 

 परभणी येथील न्यायालयात आरोपी लक्ष्मण पंडितराव शितळे याला आज शनिवार दि.०९ नोव्हेंबर रोजी हजर केले असता न्यायालयाने त्याला दि.११ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती ठाणेदार गजानन मोरे यांनी दिली याकामी ठाणेदार गजानन मोरे,भास्कर बर्गे, संदीप साळवे यांनी सहकार्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या