🌟मुंबईतील सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेवून केला यथोचित सत्कार🌟
परभणी (दि.२८ नोव्हेंबर २०२४) : राज्यातील विधानसभा निवडणूकीत अभूतपूर्व यश पटकावल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या मुंबईतील सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेवून यथोचित सत्कार केला.
उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, महामंत्री अमरनाथ खुरपे, महिला आघाडी प्रमुख सौ. सेजल कदम, मराठवाडाप्रमुख संजय कावडे, भगवान पाडळे, पंकज सिंग, पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे, प्रकाश पोरवाल, मंगेश केंद्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी व उद्योगपतींनी फडणवीस यांचा शाल, श्रीफळ देवून व पेढा भरवून यथोचित सत्कार केला. तर फडणवीस यांनी उद्योग आघाडीने निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान नियोजनबध्द पध्दतीने राबविलेल्या यंत्रणेबद्दल उद्योग आघाडीच्या पदाधिकार्यांचे कौतूक केले.
दरम्यान, उद्योग आघाडीच्या या पदाधिकार्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेवून त्यांचा सत्कार केला.....
0 टिप्पण्या