🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप🌟

💫 महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला गती प्राप्त झाली, मविआमध्ये गाडीला चाक नाही,ड्रायव्हरच्या सीटसाठी भांडण चालू, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

💫 पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला

💫 काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळ ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, 'एक है तो सेफ है' चा दिला नारा 

💫 आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा,पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार 

💫 महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे,अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा,अमित शाहांच्या वक्तव्याने महायुतीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याची चर्चा  

💫 शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावली; अमित शाहांची टीका

💫 एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत ; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं,संजय राऊतांची सडकून टीका 

💫 महाविकास आघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही, तर महाराष्ट्राला कसा चालणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

💫 ''बटेंगे तो कटेंगे हे महाराष्ट्र सहन करणार नाही''; पुण्यातील सभेतून अजित पवारांचा हल्लाबोल,रोख कोणाकडे ? 

💫 शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजे छत्रपतींनी अमित शाहांचा शिराळ्यातील समर्थ रामदासांवरील दावा खोडून काढला ; समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांकडे पाठिंबा द्यायला सांगितला आणि त्यांनी तरुण तयार केले ही भाकडकथा, इतिहास संशोधत इंद्रजित सावंतांचा संताप  

💫 मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ ;  पुस्तकात नको-नको त्या गोष्टी, ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत, वाद वाढल्याने छगन भुजबळांची सारवासारव 

💫 देवेंद्र फडणवीस यांनी ईडी,सीबीआयचा वापर करून पक्ष,घरं फोडली,खटला दाखल केला पाहिजे,ऑन कॅमेरा चर्चेला तयार ; सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज.

💫 भाजपमध्ये गेलो असतो तर मंत्री झालो असतो, तसं न केल्याने मला जेलमध्ये टाकलं ; अनिल देशमुखांचा भाजपवर घणाघात 

💫 तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना कोणती व महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप, 10 तारखेला निवृत्त होणार ;  अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला 

💫 17 प्रकल्प राज्यातून बाहेर गेले, मुख्यमंत्री म्हणाले मोठा प्रकल्प देऊ पण त्यांनी भोपळा दिला, जयंत पाटलांचा हल्लाबोल  ;  आरोप लावणारेही तेच, क्लीन चीट देणारेही तेच अन् भाजपमध्ये प्रवेश देणारेही तेच; विजय वडेट्टीवार यांचा घणाघात ; काँग्रेसने विश्वासघात केलाय, छत्रपतींसमोर दिलेला शब्द मोडला, रामटेकच्या जागेवरून भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले 

💫 अमित शाह यांच्यामुळंच महाराष्ट्राची ओळख गद्दारांचे राज्य अशी झाली, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल ;  बदलापूरच्या शाळेत लहान मुलींचे अश्लील चित्रफित, अवयव विक्रीचा प्रकार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप 

💫 प्रमोद महाजनांच्या हत्येमागे मोठं षड्यंत्र, पूनम महाजनांचा खळबळजनक दावा; नव्याने चौकशीची मागणी करणार! ; मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; प्रविण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांचे  आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर 

💫 भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही, टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळणार

  ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या