🌟आम्हाला पक्ष जिवंत ठेवायचाय, मला माहीममधून लढावचं लागेल - सदा सरवणकर
💫 देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे सांगतात, विधानसभा निवडणूक संपल्यावर एक दोन महिन्यात राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल, महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचे भाष्य ; जीडीपीमध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढेच, महायुती सरकारच्या काळात चढता आलेख, मविआवर टीकास्त्र, आशिष शेलारांचे रोहित पवारांना उत्तर
💫 एका ठिकाणी गर्दी झाली असती,लोक जास्त असले की वेळ जातो, अजित पवारांनी गोविंद बागेत न जाता काटेवाडीत पाडवा साजरा करण्याचं कारण सांगितलं
💫 बारामतीकरांचं अजित दादांवर खूप प्रेम बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील, काटेवाडीतील पाडवा उत्सवातील गर्दीवर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
💫 नवाब मलिक, हसन मुश्रीफ, पाशा पटेल हे लोक भाजपला चालतात, सज्जाद नोमानींवरुन टीका करणाऱ्यांना मनोज जरांगे यांचे सडेतोड प्रत्युत्तर ; पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल सावंत मनोज जरांगेंच्या भेटीला , राजकीय नेत्यांच्या भेटीचं सत्र सुरूच
💫 नवाब मलिक आमचे सहकारी, शिवसेना आणि भाजपला मलिकांना मदत करायची नसेल तर ती त्यांची इच्छा, प्रफुल पटेल यांचे परखड मत ; रावसाहेब दानवे म्हणाले अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी',रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा जाहीर निषेध, त्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी, अमोल मिटकरींची मागणी
💫 गोपाळ शेट्टींची विनोद तावडेंसोबत देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक, निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची भूमिका ; त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये,गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचं वक्तव्य, पुण्यातही नाराज भाजप नेत्यांच्या भेटीगाठी
💫 'आम्हाला पक्ष जिवंत ठेवायचाय, मला माहीममधून लढावचं लागेल'बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची जनता इथं राहते,सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम ; लोकसभेला पाठिंबा दिला, त्याची परतफेड म्हणून तरी विचार व्हायला हवा होता
💫 आरक्षणावरील हल्ला थांबवण्यासाठी वंचितला मतदान करा, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन, संजय राऊत म्हणाले, आयसीयू मधून त्यांनी भ्रम पसरवू नये, छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये करु नयेत ; संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, वंचितच्या सिद्धार्थ मोकळे यांचा पलटवार
💫 एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं नाशिकच्या धनराज महाले अन् राजश्री अहिरराव यांच्यासाठी चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले,निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश ; सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांची सत्तारांनी मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार, अब्दुल सत्तारांना निवडणूक आयोगाचा झटका! 24 तासांत अहवाल पाठवण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेश
💫 भाजपकडे पुन्हा उमेदवार बदलण्याची मागणी करणार,न ऐकल्यास सोमवारी स्वतःचा अर्ज मागे घेणार,विक्रमसिंह पाचपुते श्रीगोंद्यातून उमेदवार असतील,प्रतिभा पाचपुतेंची भूमिका जाहीर
💫 मुंबई कसोटीत जडेजा-अश्विनची जादू चालली, दुसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडचे 9 फलंदाज तंबूत परतले, दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी, टीम इंडियाकडे शेवट गोड करण्याची संधी
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या