🌟मानवी प्रगतीचा मार्ग म्हणजे संविधान - प्रा.डॉ.सुभाष राऊत


🌟चिखलीत समान संधी कक्ष व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले🌟 


चिखली : चिखली शहरातील एस.पी.एम.चे कला व वाणिज्य महाविद्यालय,चिखली येथे समान संधी कक्ष व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी संविधान प्रस्ताविकेचे सर्वांना वाटप करून सामुदायिक वाचन करण्यात आले. अमोल गवई व विनायक भानुसे या विद्यार्थ्यांनी संविधान दिना निमित्त मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डॉ.सुभाष राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान अर्पण करतांना दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून दिली. 

संविधान राबविणारी यंत्रणा जर तत्पर असेल तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणून निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन, पोलीस अधिक्षक म्हणून कृष्णप्रकाश आणि संविधानाची जागृती म्हणून जिल्हाधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांची उदाहरणे दिली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जय संविधान हाच मूलमंत्र द्यायला पाहिजे होता, कारण तोच मानवी विकासाचा राजमार्ग आहे. परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात संविधानाविषयी जागृती झालेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.गव्हाणे यांनी तरुणांनी संविधानाचे वाचन करून त्याचा अंगीकार केल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही असे प्रतिपादन केले.  कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ.के. ए.ठोसर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वी.के. वाकोडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.सुरेश माळशी खरे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्यासह असंख्य  विद्यार्थी उपस्थित होते......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या