🌟हिंगोली जिल्ह्यात ९ आणि १० नोव्हेंबर रोजी दोन दिवशीय निवासी कार्यशाळेचे आयोजन.....!

 


🌟या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आवश्यक माहिती व संसाधने उपलब्ध करून देणे 🌟

हिंगोली क्षेत्रात उच्च शिक्षणाच्या संधींचा अभाव असून, आज स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने, हिंगोली जिल्ह्यात ९ आणि १० नोव्हेंबर २०२४ रोजी दोन दिवशीय निवासी कार्यशाळा आयोजित करत आहोत.

* कार्यशाळेचा उद्देश :-

या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आवश्यक माहिती व संसाधने उपलब्ध करून देणे आहे. विशेषतः, विद्यार्थ्यांना भारतीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, विविध अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा प्रक्रिया, शिष्यवृत्तीच्या संधी याबद्दल माहिती देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे आमचे प्रमुख लक्ष आहे.

* कार्यशाळेची वैशिष्ट्ये :-

*- प्रमुख संस्थांचे मार्गदर्शन: विद्यार्थ्यांना प्रमुख विद्यापीठे व संस्थांची माहिती, प्रवेश प्रक्रिया व पात्रता निकष याबद्दल सविस्तर मार्गदर्शन.

*- उच्च शैक्षणिक प्रोग्राम: UG आणि PG स्तरावरील उपलब्ध कोर्सेसवर सखोल माहिती.

*- शिष्यवृत्ती संधी: विविध शासकीय व खाजगी शिष्यवृत्त्या व अर्ज प्रक्रिया याबद्दल माहिती.

*- आंतरराष्ट्रीय शिक्षण: आंतरराष्ट्रीय संस्थांच्या शिक्षण पद्धतींचा आढावा.

*- सामाजिक जागरूकता: समाजातील लिंग समानता आणि समरसतेवर चर्चासत्रे.

या कार्यशाळेत भाग घेणारे विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घेऊ शकतील. आमचा हेतू हा आहे की, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, माहिती व संसाधने प्रदान करून त्यांच्या भविष्याला उज्ज्वल बनवणे.

* सहभागी होण्याची पात्रता :-

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी १२वीच्या वर्गात शिकणारे व ग्रॅज्युएशनमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी पात्र आहेत कार्यशाळेसाठी नोंदणी फी २०० रुपये असून विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार सवलत दिली जाऊ शकते.आपल्याला या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आणि आपल्या ज्ञानाला वाव देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असून आम्ही हिंगोलीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित करत आहोत, ज्यामुळे त्यांचा भविष्याचा मार्ग खुला होईल आणि केंद्रिय विद्यापीठे व परदेशातील शिक्षण संधींमध्ये प्रवेश सुलभ होईल असेही आयोजकांनी म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या