🌟देवगिरी हॉस्पीटलमध्ये दि.०३ डिसेंबर रोजी आयोजित शिबिरात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची होणार आरोग्य तपासणी 🌟
परभणी (दि.२९ नोव्हेंबर २०२४) अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त परभणीत ०३ डिसेंबर रोजी पत्रकार व त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन परभणीतल्या देवगिरी मल्टीसुपरस्पेशालीटी हॉस्पीटल या ठिकाणी आयोजित केली आहे.
परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलच्या वतीने ही आरोग्य तपासणी करण्यात येणार असून यामध्ये विविधि प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत तर जवळपास १० सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची टिम तपासणी करणार आहेत याच शिबीरात इच्छूक पत्रकार व नागरिकांसाठी रक्तदान शिबीराचं आयोजन देखील करण्यात आले आहे. या शिबीराचा जिल्हाभरातील पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पत्रकार संघ आणि देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबीरात शुगर, बीपी, इसीजी या बरोबरच सीबीसी, एचबीएवनसी, लिपीड प्रोफाईल, थायराईड प्रोफाईल, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन एचपीएलसी आदींसह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. शिबीराची सुरुवात सकाळी 8 वाजता होणार आहे. या शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यासाठी एमडी मेडीसीन डॉ. आंबेगावकर, डॉ. अजय कुंडगिर, जनरल सर्जन डॉ. परमेश्वर साळवे, डॉ. निहार चांडक, न्युरॉला जीस्ट डॉ. अतुल जाधव, डॉ. एकनाथ गबाळे, कार्डीओलॉजीस्ट डॉ. व्यंकटेश हराळे, नेप्थॉलॉजीस्ट डॉ. राहूल टेंगसे, युरॉलॉजीस्ट डॉ. कोंडावार, अस्थिरोग तज्ञ डॉ. सुर्यतळ, नेत्रतज्ञ डॉ. संदिप वानखेडे, फिजीओथेरपिस्ट डॉ. अश्विनी सुर्यतळ आदी पत्रकार व त्यांच्या कुटूंबीयांची तपासणी करणार आहेत. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजगोपाल कालानी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, ज्येष्ठ साहित्यीक तथा पत्रकार डॉ. आसाराम लोमटे, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
पत्रकार व त्यांच्या कुटूंबीयांच्या आरोग्याची तपासणी करण्याची संकल्पना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी मांडली असून त्यानुसार संपूर्ण राज्यभरात पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात येते. राज्यभरातल्या हजारो पत्रकारांची तपासणी करण्यात येते. परभणीत यावर्षीचे तपासणी शिबीर देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबीराचा जिल्हाभरातील पत्रकार, पत्रकार क्षेत्राशी संबंधित सर्व व त्यांच्या कुटूंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.......
0 टिप्पण्या