🌟मतदारसंघातील तिन्हीं तालुक्यांच्या अस्तित्वाचा लढा 'तोडो फोडो राज करो' फिरंगी नियतीचा अवलंब समाज घातकी ठरणार ?🌟
🌟अपक्ष उमेदवारांकडून मतविभागणी म्हणजे 'शिक्याच तुटन अन् बोक्याच साधन'🌟
✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश (रणजित)
परभणी (दि.०५ नोव्हेंबर २०२४) परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार वर्ग जातीयवाद/धर्मवादाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक विधानसभा/लोकसभा निवडणुकीत अगदी मोठ्या मनाने आपल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून सातत्याने मतदान करीत आला असून गंगाखेड विधानसभा मतदारसंघात भुतपूर्व आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड, भुतपूर्व आमदार विठ्ठल पुरभाजी गायकवाड यांच्यासह गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राज्याच्या विधानसभेत तब्बल तीन वेळेस प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सिताराम चिमाजी घनदाट या मागासवर्गीय उमेदवारांना मतदान करुन बहुमताने निवडून देणारा येथील मतदाता निर्मळ मनाचा असला तरीही जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या संकुचित बुध्दीमत्तेच्या तत्वभ्रष्ट राजकारण्यांनी आता या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जातीय विषमतेची विषारी पेरणी करण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येत असून यांनी आपआपल्या पक्षतत्वानुसार स्वतःच्या स्वार्थापोटी घातलेला तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद तथाकथित हिंदुत्ववाद संकुचित समाजवादाचा बुरखा बदलत्या काळानुसार निर्लज्जपणे स्वतःच टराटरा फाडीत 'तोडो फोडो राज करो' या 'गोऱ्या इंग्रज नितीचा' अवलंब करीत भयंकर जातीय विषमता निर्माण करण्यास सुरुवात केल्याने कधीकाळी राष्ट्रीय सामाजिक एकात्मता आपल्या जिवापाड जोपासणाऱ्या या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तीन तालुक्यात सामाजिक एकात्मतेसाठी येणारा काळ अत्यंत खडतर ठरण्याची चिन्हें आता दिसू लागली आहेत.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राज्यातील शिवसेना (शिदे)-भारतीय जनता पार्टी-राष्ट्रवादी कॉंग्रेस-राष्ट्रीय समाज पार्टीच्या सत्ताधारी महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे,विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवलेले माजी आमदार सिताराम घनदाट यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार विशाल कदम या तिघांमध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जोरदार लढत होण्याची शक्यता असली तरीही जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या काही पडद्यामागील जातीयवाद्यांचा डोळा मात्र या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विशिष्ट समाजांच्या निर्णायक मतदानावरच अवलंबून असल्याचे चित्र निर्माण केल्याचे पाहावयास मिळत असून मतदात्यांना भावनिक करुन मतविभाजनाचा डाव देखील खेळला जात आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे हे यावेळी तिसर्यांदा निवडणूकीच्या मैदानात उतरले असून मागील सन २०१९ मध्ये झालेल्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत कारागृहातून निवडणूक लढवून सर्वाधिक ८१ हजार १६९ मत मिळवून बहुमताने निवडून येत परभणी जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारे विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे संपूर्ण तयारीनिशी विरोधकांना निवडणूक मैदानात अक्षरशः धुरळा उडवण्यासाठी उतरलेले आहेत परंतु त्यांच्या विरोधात मागील निवडणुकीत प्रखर हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवून ६३ हजार १११ एवढे मतदान मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले त्यांचे प्रतिस्पर्धी विशाल विजयकुमार कदम हे यावेळी पुन्हा विरोधी पक्षांच्या धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून दंड थोपाटून विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना आव्हान देत निवडणूक मैदानात उतरले असून या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवून तीन वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले ज्येष्ठ नेते माजी आमदार सिताराम घनदाट हे देखील वंचित बहुजन आघाडीमार्फत रिंगणात उतरले असल्याने या तिन्ही तूल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये जोरदार लढत होणार असली तरी प्रत्येकाचे लक्ष मतविभाजनाकडे लागले असून भारतीय जनता पार्टीशी आजिवण एकनिष्ठ राहून देखील प्रत्येक निवडणुकीत पक्षाकडून डावलले गेलेले भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते तथा परभणी जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल मामा रबदडे यांनी देखील जनहित लोकशाही पार्टी कडून तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख रुपेश मनोहरराव देशमुख यांनी देखील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल केली असून या व्यतिरिक्त गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ०६ अपक्ष उमेदवार देखील निवडणूक मैदानात उतरले असून यांच्यातील मतविभाजनाचा फायदा महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना होतो की महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांना होतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सिताराम घनदाट यांना होतो हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल परंतु सध्या तरी नैतिक चारित्र्य अनैतिक चरित्र आणी चित्र विचित्र तीन बाबींवर संपूर्ण गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा रंगतांना पाहावयास मिळत आहे त्यामुळेच या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होणार हे स्पष्ट दिसत असून या मतविभाजनाचे साद-पडसाद हे निवडणूक निकालावरच उमटणार हे निश्चित आहे.
🌟गंगाखेड विधानसभेच्या मतपत्रिकेवरुन प्रमुख राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे गायब :-
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मागील प्रत्येक निवडणूकीत शिवसेनेचा धनुष्यबाण,काँग्रेस पक्षाचा पंजा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ ही तिन्ही महत्वपूर्ण निवडणूक चिन्ह मतदार यादीवर आली आहेत परंतु महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या या विधानसभा निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर, काँग्रेसच्या पंजावर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर एकही उमेदवार उभा नाही शिवसेना उबाठा गटाची मशाल तर विद्यमान आमदार गुट्टे हे ऑटोरिक्षा व माजी आमदार घनदाट हे गॅस सिलेंडर या चिन्हावर भवितव्य आजमावणार आहेत. गंमत म्हणजे लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे शिट्टी या चिन्हावर रिंगणात होते. त्यांचे ते चिन्ह या विधानसभेत राष्ट्रीय मराठा पार्टीचे माधव सोपानराव शिंदे यांना मिळाले आहे. या उलट हे चिन्ह पाथरी मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे सईद खान यांना बहाल झाले आहे.......
0 टिप्पण्या