🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.....!


🌟राज्यात महायुतीला घवघवीत यश प्राप्त करून देत राज्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल केले अभिनंदन🌟


मुंबई :- धोरणी व चाणाक्ष राजकारणी म्हणून देशभर परिचित असलेले महायुतीचे प्रमुख मार्गदर्शक तथा भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीला घवघवीत यश प्राप्त करून देत दोनशेंच्या पार जागा मिळवून देत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल आज रविवार दि.२४ नोव्हेंबर रोजी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भरघोस मतांनी विजयी झालेले आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी त्यांची प्रत्यक्ष सदिच्छा भेट त्यांचे अभिनंदन केले. 

यावेळी महायुतीच्या विजयाचे शिल्पकार भाजपा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या