🌟परभणीतील कॉफी शॉप मध्ये स्पेशल रूम,बेड/कॉट व कॅबीन सुविधा असणारे कॉफी शॉपचे लायसन तात्काळ रद्द करा...!


🌟संभाजी सेना शहरप्रमुख अरुण पवार यांची पोलिस प्रशासनाकडे मागणी🌟 

परभणी :- परभणी शहरातील विविध भागांमध्ये कॉफी शॉपच्या माध्यमातून स्पेशल रूम,बेड/कॉट व कॅबीन सुविधा असणारे कॉफी शॉपचे लायसन तात्काळ रद्द करुन अशा कॉफी शॉप विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी सेनेचे शहरप्रमुख मागील सह वर्षांपासून विनंती अर्जाद्वारे परभणी जिल्हा पोलिस प्रशासनासाकडे करीत असून त्यांच्या निवेदनावरुन सन २०१९ मध्ये शहरातील अशा कॉफी शॉप विरोधात दामिनी पथकाने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्यानंतर तेव्हा परभणी शहरातील कॉफी शॉप मधील कॅबिन सुविधा बंद करण्यात आल्या परंतू त्यानंतर परत हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि आता मुलींचे व्हिडिओ काढणे त्यांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे हा प्रकार वाढला असून अशातच अल्पवयीन मुलीवर कॉफी शॉप मध्ये नेऊन बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली  

परभणी सारख्या शहरामध्ये घडलेली ही घटना खूप दुर्दैवी आहे संभाजी सेना शहरप्रमुख अरुण पवार यांनी म्हटले असून त्यांनी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती केली आहे की पोलिस प्रशासनाने या कॉफी शॉपच्या माध्यमातून घडणाऱ्या घटनांची गंभीर्याने दखल घेऊन तात्काळ अनधिकृत आणि अशा पद्धतीने चालणाऱ्या कॅफे शॉपवर कठोर कारवाया कराव्यात अन्यथा परभणीतील नागरिकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे करण्यात येईल आणि यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असेही संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण पवार यांनी म्हटले आहे नोंद......


                                    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या