🌟लोकनेते विजय वाकोडे यांनी वंचित बहुजन आघाडीवर केली जोरदार टिका🌟
परभणी (दि.१६ नोव्हेंबर २०२४) : परभणी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे फार सक्षमपणे निवडणूकीच्या रिंगणात उतरले नाहीत अशी खंत व्यक्त करीत रिपब्लिकन सेनेचे नेते विजय वाकोडे यांनी आज शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या समर्थनाची भूमिका जाहीर केली.
परभणीत आज शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून लोकनेते विजय वाकोडे यांनी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण व अन्य पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासोबत चर्चा केली त्याद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रचारयुध्दात ते फारसे सक्रिय नाहीत प्रभाव टाकू शकतील असेही चित्र नाही त्यामुळे आपल्यासह कार्यकर्त्यांनी या विषयी आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा केली या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या असे ते म्हणाले.
परभणी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदार पाटील यांनी जे काही काम केले ते समाधानकारक आहे. विशेषतः टक्केवारीतल्या नेतेमंडळीत ते मोडत नाहीत त्यांचे राजकारण आणि समाजकारण हे सरळ सरळ आहे सर्वसामान्य व्यक्तींच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे त्यामुळे या निवडणूकीत पाटील यांच्या समर्थनाची आम्ही भूमिका घेतली असल्याचे लोकनेते विजय वाकोडे म्हणाले.....
0 टिप्पण्या