🌟परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित दुसर्‍या प्रशिक्षणासही ४६ कर्मचारी गैरहजर....!


🌟या सर्वांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली🌟

परभणी (दि.०९ नोव्हेंबर २०२४) : महाराष्ट्र राज्यासह परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सभागृहात आज शनिवार दि.०९ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या दोन सत्रीय प्रशिक्षण शिबीरात एकूण ४६ कर्मचारी गैरहजर होते.

                  निवडणूक आयोगाचे निरिक्षक श्रीमती के. हरिता, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप राजापूरे, श्रीमती आम्रपाली कासोदीकर, उमाजी बोथीकर, अनिकेत पालेपवाडी, गणेश चव्हाण, श्रीमती अनिता वडळकर व सचिन कवठे हे अधिकारी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मतदानयंत्र सील करण्या संदर्भात त्याचे हॅन्डऑन प्र्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक कर्तव्यावर असतांना अधिकारी-कर्मचार्‍यांच्या मतदानाकरीता चार ठिकाणी सुविधा कक्षांचीही स्थापना करण्यात आली. तसेच केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांना आवश्यक असणारे वाचन साहित्य क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आले. त्याचे निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता यांनी कौतूक केले.

                 दरम्यान, प्रथम सत्रात ९५८ पैकी २५ कर्मचारी तर दुपारच्या सत्रात ८५५ पैकी २१ कर्मचारी गैरहजर होते या सर्वांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या