🌟सगळ्यांचा नाद करा,पण शरद पवारांचा नाही ; साधंसुधं पाडायचं नाही,जोरात पाडायचं,महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे - शरद पवार
💫 पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पातळीवर 17 वा पुरस्कार; नायजेरिया कडुन ग्रॅड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
💫 सगळ्यांचा नाद करा, पण शरद पवारांचा नाही ; साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं, महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे ; शरद पवारांचा टेंभूर्णीतील सभेत एल्गार ; ज्यांचे हात स्वच्छ आहेत,त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल ; मी साहेबांना सोडलं नाही, सर्व आमदारांची सरकारमध्ये जाण्याची इच्छा होती, त्यामुळे निर्णय घेतला, अजितदादा पवारांचा मोठा दावा
💫 'मी चोरी करायला आलीये का ?' बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर नात रेवतीसह अडवल्यावर शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांचा संताप, अर्धा तास ताटकळत ठेवल्यानंतर दोघींना आत सोडले ; ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता ; सुप्रिया सुळेही भडकल्या ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताईं पवारांच्या बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांना अडवल्यामुळे सोशल मीडियावर अजितदादा पवारांवर अनेकांची टीका
💫 मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फाॅर्म्युला ठरलेला नाही, सरकार बहुमताने आणण्यासाठी आमची प्राथमिकता ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचे वक्तव्य; माहीमवरुन राज ठाकरेंसोबत थोडा दुरावा निर्माण झाला, दोघांनाही दोघांचा पक्ष जपायचा आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
💫 महाराष्ट्र गुजरात आणि अदानीच्या चरणी वाहणार्या बुटचाट्यांच्या हाती देणार का ? पाटणच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात ; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका ; मुस्लीम समाजानं वंचितला मतदान करावं, पैगंबर बील आणू, 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करणार, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
💫 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधी यांचें ट्विट; बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त केले अभिवादन ; काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, राहुल जगताप आणि माजी आमदार राजू तिमांडे यांचं पक्षातून निलंबन
💫 नाना पटोले हे स्वयंभू घोषित मुख्यमंत्री, त्यांच्या वक्तव्याला कोणीही बळी पडणार नाही, खासदार प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला ; आमच्या गरिबांची पान टपरी बरी, मात्र महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीशिवाय सरकार बनणार नाही; परिवर्तन महाशक्तीच्या बच्चू कडू यांचा विश्वास
💫 'घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार' ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप जाहिरातीमधील ठरविक भाग काढण्याचे निर्देश ; अमित ठाकरेंचं डिपॉझिट वाचलं तरी मोठी गोष्ट; आमदार सदा सरवणकरांचा 'राजपुत्रा'वर बोचरा वार
💫 मणिपूरमध्ये 3 महिला आणि 3 मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला, 5 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू, 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ; मणिपूर पुन्हा पेटताच अमित शाहांनी महाराष्ट्र दौरा केला तडकाफडकी रद्द, तातडीने दिल्ली गाठली
💫 इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
💫 रोहित शर्मा पर्थ कसोटीतून बाहेर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळणार, 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार पहिला कसोटी सामना
✍️मोहन चौकेकर
0 टिप्पण्या