🌟केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जिंतूर विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकरांच्या प्रचारार्थ सभा...!


🌟जिंतूर येथील जिल्हा परिषद मैदानावर अमित शाह यांची बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार🌟

 परभणी/जिंतूर (दि.११ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील महायुतीच्या अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२.०० वाजता जिल्हा परिषद मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

             या विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री शाह यांची ही सभा होणार असून या सभेच्या निमित्ताने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सभेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने भक्कम असे नियोजन केले आहे. विविध बैठकांमार्फत जिंतूर व सेलू या दोन तालुक्यातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ सभेस उपस्थित रहावे, या दृष्टीनेही व्यूहरचना केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या