🌟महाविकास आघाडी उमेदवार रविंद्र चव्हाण महायुती उमेदवार डॉ.हंबर्डेसह वंचितचे ॲड.भोसीकरही निवडणूक रिंगणात🌟
नांदेड (दि.०५ नोव्हेंबर २०२४) :- नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेची पोट निवडणूक व राज्यातील विधानसभा निवडणुक एकत्रित होत असून या नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडून स्व.खा.वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रविंद्र वसंतराव चव्हाण निवडणूक लढवत आहेत तर सत्ताधारी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे डॉ.संतुकराव मारोतराव हंबर्डे तर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ॲड.अविनाश विश्वनाथ भोसीकर लोकसभा निवडणूक लढवत असून या नांदेड लोकसभेच्या पोट निवडणुकीच्या रिंगणात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
* नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार व त्यांना मिळालेले निवडणूक चिन्ह :-
१) रविंद्र वसंतराव चव्हाण- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात),
२) डॉ.संतुकराव मारोतराव हंबर्डे- भारतीय जनता पार्टी (कमळ),
३) ॲड अलताफ अहेमद- इंडियन नेशनल लीग (शिवण यंत्र),
४) अविनाश विश्वनाथ भोसीकर- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),
५) कल्पना संजय गायकवाड- बुलंद भारत पार्टी (माईक),
६) खमर बिन बदर अलजाबरी- ऑल इंडिया मजलिस ए इंकीलाब ए मिल्लत (जहाज),
७) गंगाधर भांगे- राष्ट्रीय समाज पक्ष (टीलर),
८) नागोराव दिगंबर वाघमारे- जनहित लोकशाही पार्टी (ऑटो रिक्शा),
९) राजू मधुकर सोनसळे- रिपब्लिकन सेना (शिट्टी),
१०) विष्णु मारोती जाधव- राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टी (ट्रम्पेट),
११) सय्यद सैदा- नवरंग काँग्रेस पार्टी (फुलकोबी),
१२) अब्दुल सलाम सल्फी - अपक्ष (टेबल),
१३) कंटे सायन्ना - अपक्ष (हिरा),
१४) गजभारे साहेबराव भिवा- अपक्ष (पेनाची निब सात किरणांसह),
१५) चालीका चंद्र शेखर- अपक्ष (काचेचा पेला),
१६) मधुकरराव किशनराव क्षिरसागर- अपक्ष (अंगठी),
१७) मन्मथ माधवराव पाटील- अपक्ष (कलिंगड),
१८) यादव धोंडीबा सोनकांबळे- अपक्ष (एअर कंडिशनर)
१९) संभाजी दशरथ शिंदे- अपक्ष (कपाट).
0 टिप्पण्या