🌟जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिक्षक विजय सतबीरसिंघ यांना शिख समाजाने दिले निवेदन🌟
नांदेड (दि.३० नोव्हेंबर २०२४) - नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानक ते नांदेड रेल्वे स्थानक दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने या संपूर्ण रस्त्याचे सिमेंट कॉक्रेटीकरणाचे काम लवकरच करण्यात येणार असून त्यासाठी नांदेड मध्यवर्ती बसस्थानचे तात्पुरतं स्थलांतर करण्याकरीता प्रशासनाकडून नांदेड शहरातील शिख समाजाची वसाहत अबचलनगर नांदेड येथील मोकळी जागा निवडण्यात आली परंतू या भागामध्ये शिख समुदायाचे नागरिक बहुसंख्येने राहत असल्याने बसस्थानकाचे परिसरात स्थलांतर झाल्यास याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची रेलचेल सुरु होईल शिख समुदायामध्ये तंतोतंत प्रतिबंधीत असणारे सिगरेट, तंबाखु,गुटखा याची सेवन तात्पुरत्या बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढणार असून हा प्रकार टाळणे मोठे अवघड काम आहे त्यामुळे यावरुन प्रवासी नागरिक व या अबचलनगर परिसरातील रहिवासी शिख समुदायाच्या स्थानिक नागरिकांमध्ये भांडण तंटे निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचे अबचल नगर परिसरात तात्पुरते स्थलांतर करण्यास संपूर्ण स्थानिक शिख समुदायाने तिव्र विरोध दर्शवला असून या संदर्भात आज शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी नांदेड येथील बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य सचिव स.मनबीरसिघ्र ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांच्या नेतृत्वाखालील शिख समाजाच्या शिष्टमंडळाने नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत,जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार व नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक विजय सतबीरसिंघ यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन नांदेड बसस्थानकाच्या अबचलनगर येथील तात्पुरत्या स्थलांतरास विरोध दर्शवला असून निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की अबचल नगर व परिसराच्या भाग हा अत्यंत वर्दळीचा असल्याने व तेथे वाहनाची रेलचेल जास्त असल्याने तेथे तात्पुरते बसथानक उभारल्यास वाहतुक मोठ्या प्रमाणात खोळंबीत होईल याचा सुध्दा गांभीर्याने विचार होणे आवश्यक असुन त्या आधारावर अबचल नगर येथे तात्पुरते बसस्थानक उभारण्याऐवजी ते इतरत्र उभारणे सर्व दृष्टीने सोयीस्कर होईल. त्यास प्रमाणे जिल्हा प्रशासनाने गुरुद्वारा बोर्डाशी कोणत्याही प्रकारची सल्लामसलत व परवानगी न घेता सदर स्थलांतर करण्याचे निर्णय घेतल्याचे लक्षात येत आहे गुरुद्वारा बोर्डाने नेहमीच शहर विकासाच्या कामामध्ये सहकार्य करीत सुमारे २५० ते ३०० एक्कर जमीन जिल्हा प्रशासनाला शहर विकासाच्या कामाकरीता दिली असुन त्याचा आता पर्यंत कोणताही मोबदला प्रशासनाकडून सचखंड गुरुद्वारा बोर्डाला मिळाला नाही तसेच कोविड काळामध्ये देखील गुरुद्वारा बोर्डाच्या आधिन असलेले पंजाब भवन व एन.आर.आय यात्री निवास व रुग्णाची व्यवस्थेसाठी कोविड सेंटर साठी यात्री निवास देण्यात आले होते. त्याच्या मोबदल्याची रक्कम अद्याप पुर्णपणे देण्यात आली नाही.
तरी जिल्हाधिकारी मा.डॉ.अभिजीत राऊत व गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजयसतबीर सिंघ यांना विनंती करण्यात येते की अबचल नगर परिसरात तात्पुरते बसस्थानकाचे स्थलांतर करण्याऐवजी गुरुद्वारा बोर्ड मालकीची जमीन सोडून इतरत्र स्थलांतर करावे अन्यथा या विरुध्दात जिल्हाधिकारी कार्यालया समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा देखील इशारा निवेदनात देण्यात आला असून निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की सत्तेचा दुरुपयोग करुन ही जमीन काबीज केली व बसस्थानकाचे काम सुरु केले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी व गुरुद्वारा प्रशासक यांची राहिल याची देखील प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी यावेळी शिष्टमंडळात शिख समाजातील प्रतिष्ठित नागरिक जेष्ठ पत्रकार स.रविंदरसिंघ मोदी,स. बिरेंद्रसिंघ नारायणसिंघ बेदी,स.भोलासिंघ भुजंगसिंघ गाडीवाले,स.मनिंदरसिंघ (राज) गुरबचनसिंघ रामगृहीया,स. जसबीरसिंघ महेंद्रसिंघ बंगई,स.जसपालसिंघ ग्यानसिंघ लांगरी,स.मनप्रितसिंघ कारागीर,स.अवतारसिंघ पहरेदार,स.बक्षीसिंघ भिमसिंघ पुजारी,स.दिपकसिंघ रतनसिंघ गल्लीवाले,स. जगजीतसिंघ बिशनसिंघ खालसा,स.परशनसिंघ दर्शनसिंघ नहेंग,स.रविंद्र सिंग पुजारी,स.सरताज सिंघ सुखमनी,स.करणसिंघ चंदन आदी मान्यवरांचा समावेश होता...
0 टिप्पण्या