🌟निवडणूक निरीक्षक के.हरिता यांची प्रमुख उपस्थिती🌟
परभणी (दि.09 नोव्हेंबर 2024) : परभणी विधानसभा मतदारसंघातंर्गत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना आज शनिवार दि.09 नोव्हेंबर रोजी व्दितीय प्रशिक्षण देण्यात आले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात शनिवार दि.09 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता,जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती हरिता यांनी प्रशिक्षणाच्या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. तसेच निवडणूक कर्तव्यार्थ असणार्या कर्मचार्यांच्या पोस्टल मतदान प्रक्रियेची देखील पाहणी केली. प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिकारी गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परभणी विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांच्यासाठी आवश्यक असणारे वाचन साहित्य क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अभिनव कल्पनेचे श्रीमती हरिता यांनी कौतुक केले.......
0 टिप्पण्या