🌟शिवसेना माजी शहरप्रमुख नितीन उर्फ बंटी कदम स्विकारणार आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे खंबीर नेतृत्व🌟
परभणी (वृत्त विशेष) :- परभणी जिल्ह्यात शिवसेना उबाठा गटातील अंतर्गत कलह भुकंपाच्या लाव्हासराप्रमाणे हळुवारपणे बाहेर येण्यास सुरुवात झाली असून शिवसेना उबाठा गटातील एकाधिकारशाहीला जबरदस्त आव्हान देत शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख तथा गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांच्या पुर्णा तालुक्यातील पुर्णा शहराचे माजी शहरप्रमुख तथा शिवसेना नगरसेविका विमलताई लक्ष्मणराव कदम पाटील यांचे सुपुत्र व परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे नितीन उर्फ बंटी कदम यांनी शिवसेना उबाठातील एकाधिकारशाहीला प्रति आव्हान देत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे सर्वसमावेशक खंबीर नेतृत्व तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर काका गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ.रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उद्या मंगळवार दि.०५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहिर प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने परभणी जिल्हा शिवसेना उबाठा गटात खळबळ माजली आहे.
परभणी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या तालुक्यातच शिवसेनेत अंतर्गत कलह माजल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये देखील आश्चर्य व्यक्त केलं जातं असून पुर्णा नगर परिषदेतील शिवसेनेच्या नगरसेविका विमलताई लक्ष्मणराव कदम पाटील यांचे सुपुत्र तथा पुर्णा शहराचे शहरप्रमुख पदाची जबाबदारी तब्बल दहा वर्षे यशस्वीपणे पार पाडीत शिवसेना पक्ष ग्रामीण भागात पोहोचवणारे शिवसेना उबाठा माजी शहरप्रमुख व हटकरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नितीन उर्फ बंटी लक्ष्मणराव कदम पाटील यांनी पक्षांतर्गत वाढलेल्या एकाधिकारशाहीला आव्हान देत शिवसेना उबाठा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून नितीन उर्फ बंटी कदम हे उद्या मंगळवार दि.०५ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील सुमन मंगल कार्यालयात दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात डॉ.रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार आहेत त्यांच्या या पक्षांतराचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होईल हे तर निवडणूक निकालानंतरच कळेल परंतु त्यांनी घेतलेल्या पक्षांतराच्या निर्णयामुळे शिवसेना उबाठा गटासह महाविकास आघाडीत देखील खळबळ माजली आहे.....
0 टिप्पण्या