🌟हिंगोली जिल्ह्यातील आ.तानाजी मुटकूळे हिंगोली,आ.संतोष बांगर कळमनुरी,आ.राजेश नवघरे वसमत हे तिन्हीं विद्यमान आमदार विजयी🌟
शिवशंकर निरगुडे - हिंगोली
हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात महायुतीने गड राखला असून संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेल्या कळमनुरी विधानसभा मतदार संघात शिंदे सेनेचे संतोष बांगर यांनी विजय मिळविला आहे.तर वसमतमध्ये राजकिय गुरुवर शिष्य भारी ठरला असून राजेश नवघरे विजयी झाले आहेत. हिंगोलीत भाजपाचे तान्हाजी मुटकुळे यांच्या रुपाने भाजपाने हॅट्रीक साधली आहे.
वसमत विधानसभा मतदार संघात माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर विरुध्द विद्यमान आमदार राजेश नवघरे या राजकिय गुरु शिष्यामध्ये लढत झाली. यामध्ये शिष्य राजेश नवघरे भारी ठरले असून त्यांनी एकहाती विजय मिळविला आहे कळमनुरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने रान उठविले होते. तर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिंगोलीत सभा घेतली होती. त्यामुळे या विधानसभा मतदार संघाकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले होते.या निवडणुकीत शिंदेसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे डॉ. संतोष टारफे यांचा पराभव करून विजय मिळविला.....
0 टिप्पण्या