🌟भारताच्या आर्थिक विकासाची गाडी घसरली : भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का ?

 


🌟आर्थिक विकास पोहोचला दर दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर : जीडीपी २ वर्षांतील नीच्चांकी स्तरावर🌟

नवी दिल्ली : (वृत्तसंस्था) देशाच्या विकासाचा दर कमालीचा मंदावला आहे. २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीचा आर्थिक विकास दर दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. एक वर्षापूर्वी याच काळात हा विकास दर ८.१ टक्के होता, तो आता ५.४ टक्क्यांवर आला आहे. देशातील महत्त्वाच्या भागातील कमकुवत मागणी आणि प्रतिकूल हवामान यामुळे यंदा जीडीपीची वाढ मंदावल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पहिल्या तिमाहीत हा दर ६.७ टक्के राहिला होता.

चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील भारताच्या जीडीपीचे आकडे जाहीर झाले आहेत. आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत देशाच्या आर्थिक विकासाचा दर ५.४ टक्के इतका नोंदवला गेला. जो गेल्या दोन वर्षातील सर्वात निच्चांकी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८.१ टक्के इतका आर्थिक विकास दर होता. या आर्थिक वर्षात एप्रिल-जून या तिमाहीत ६.७ टक्के इतका विकास दर होता. देशातील नागरिकांनी खर्च कमी केल्याने आणि काही प्रमुख क्षेत्रातील खराव कामगिरीचा परिणाम जीडीपीचर झालेला दिसून येतो. यायावत तज्ज्ञांनी याआधीच भविष्यवाणी केली होती.

🌟जीडीपी घसरण्यामागे अर्थतज्ज्ञांच्या मते अन्नधान्याची वाढती महागाई :-

जीडीपी घसरण्यामागे अर्थतज्ज्ञांच्या मते अन्नधान्याची वाढती महागाई, उच्च कर्ज खर्च आणि स्थिर वेतन्याद यांचा समावेश आहे. या घटकांमुळे शहरातील लोकांनी खर्च कमी केला. किरकोळ अन्न महागाई ऑक्टोबरमध्ये १०.८७ टक्के पर्यंत वाढली होती. यामुळे लोकांनी खर्व कमी केला होता. जीडीपीसाठी ६० टक्के एवढे योगदान हा शहरी भाग देत असतो. त्यानेच पाठ फिरविल्याने जीपीडीपवर मोठा परिणाम झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या