🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांसह समर्थकांचा सोशल मिडियावर प्रचार प्रसिध्दीचा धुमाकूळ ?


🌟जनशक्तीला धनलक्ष्मीच्या बळावर गुलाम बनवू पाहणाऱ्या प्रस्थापित उमेदवारांच्या नजरेत प्रसारमाध्यमांची किंमत शून्य ?🌟   


परभणी :- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघ असा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे ज्या विधानसभा मतदारसंघात मतदार सर्वसामान्य तर निवडणूक लढवणारे उमेदवार मात्र आर्थिकदृष्ट्या धनदांडगे प्रस्थापित असतात या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांना धार्मिक भावनांसह आर्थिक अमिषाला बळी पाडून सहज निवडणूक जिंकता येते हा खुळासमज मागील जवळपास तीन/चार विधानसभा निवडणुकींचा इतिहास पाहता प्रस्थापित धनदांडग्या उमेदवारांचा झाल्यामुळे या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात जनशक्तीला धनलक्ष्मीच्या बळावर अगदी सहजपणे गुलाम बनवता येऊ शकते असा खुळा गैरसमज काही कर्तृत्वशून्य राजकारण्यांनी करून घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.


गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवून धनलक्ष्मीच्या बळावर निवडणूक जिंकून राज्याच्या विधानसभेत प्रवेश करण्याची स्वप्नं रंगवणाऱ्या प्रस्थापित धनदांडग्यांच्या नजरेत काही बोटावर मोजण्या इतके लाचार वगळता प्रसिध्दी माध्यमांच्या जनहीतवादी प्रतिनिधींची किंमत कवडीची देखील नसल्याचे निदर्शनास येत असून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन्ही तालुक्यांमध्ये या मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह काही मोजक्या ताटाखालील मांजरांना हाताशी धरुन वाट्सॲप,युट्यूब,फेसबुक,इन्स्टाग्राम आदी सोशल मिडियावर अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास येत असून सोशल मिडियावर मोफत प्रसिध्दी मिळत असल्यामुळे प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना या मतदारसंघात निवडणूक लढवणारे प्रस्थापित धनदांडगे अत्यंत हिन दर्जाची वागणूक देतांना दिसून येत आहेत.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मागील सन २०१४ व २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या धार्मिक भावनांना हात घालून मतदार संघातील असंख्य धार्मिक स्थळांचे जिर्णोद्धार तर काही ठिकाणी नव्याने धार्मिक स्थळांची उभारणी करीत भावनिक धुमाकूळ घालणाऱ्या प्रस्थापिताने चक्क एका राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला अमानुषतेचा कळस गाठत आपल्या कार्यालयाबाहेर दोन अडीच तास ताटकळत ठेवून अपमानास्पद वागणूक देत आपल्या अहंकारी प्रवृत्तीचा परिचय देत आम्हाला पत्रकारांची काहीच गरज नाही असे म्हणून चक्क पत्रकारांच्या विरोधात देखील गरळ ओकल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून त्या संकुचित बुध्दीमत्तेच्या अहंकारी प्रस्थापित उमेदवाराने दिलेल्या अपमानास्पद वागणूकी संदर्भात बोलतांना आंबेडकर नॅशनल काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेले नामदेव दिपके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की 'माणसांची किंमत पैशांमध्ये मोजणारा व वैचारिकता नसणारा व पत्रकारांची आम्हाला गरज नाही असे अहंकाराने बोलणारा उमेदवार जनतेच्या समस्या काय सोडविणार ?' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत उभे राहणाऱ्यांचेच सोडाहो निवडणूक जिंकून या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना देखील प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींची किंमत नाही प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना वर्षातून एकदा जाहिरात देण्यास प्रथमतः टाळाटाळ करायची आणि यदाकदाचित एखाद वेळेस संकुचित मन मोठे करुन दिवाळी अंकासाठी जाहिरात जरी दिली तरी त्या जाहिरातींंचे पैसे बुडवणारे महाभाग देखील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतांना पहावयास मिळतात कदाचित असेही असू शकते त्या लोकप्रतिनिधीने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीचे जाहिरातीचे पैसे जरी दिले तरी ते पैसे त्या प्रतिनिधी पर्यंत पोहोचतच नाही कारणं त्या लोकप्रतिनिधीचा मधला लपूट कारभारी ते पैसे गिळंकृत करून आपल्या नेत्याच्या नावाला मागील वर्षानुवर्षे अक्षरशः काळीमा फासण्याचे दुष्कृत्य देखील करतांना या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांना पाहावयास मिळाले त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तत्वभ्रष्ट राजकारण्यांना प्रसिध्दी माध्यमांचे महत्त्व काय असते हे अद्यापही कळाले नसल्याचे निदर्शनास येत असून काही नवख्यांनी तर आता सर्वसामान्य मतदार जनतेसह प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील जातीपातीच्या दुष्ट नजरेतून पाहावयास सुरुवात केल्याने अशा नटभ्रष्टांच्या संकुचित मनोवृत्तीची संपूर्ण मतदार संघात जोरदार चर्चा होतांना पाहावयास मिळत आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या