🌟यावेळी शिख सिकलकरी बांधवांच्या वतीने लंगर प्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते🌟
परभणी (दि.१५ नोव्हेंबर २०२४) :- परभणी शहरातील गुरू गोविंद सिंघजी नगर येथे आज शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी शिख धर्माचे संस्थापक प्रथम गुरू श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या ५५५ व्या जयंती निमित्त अर्थात प्रकाशपर्वा निमित्त येथील पवित्र गुरुद्वाऱ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या ५५५ व्या जयंती निमित्त अर्थात प्रकाशपर्वा निमित्त सकाळी पवित्र निशाण साहीबचे (धार्मिक ध्वज) द्वाजारोहन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शिख सिकलकरी बांधवांनी 'जो बोले सो निहाल सतश्री अकाल'च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला शिख धर्माच्या धार्मिक परंपरेनुसार संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी अरदास (प्रार्थना) पाठ केल्यानंतर शिख सिकलकरी बांधवांच्या वतीने लंगर प्रसादाचे (अन्नदान) देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी शिख बांधवांच्या वतीने संपूर्ण देश वासियांना गुरु नानक देवजी महाराज यांच्या ५५५ व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या.......
0 टिप्पण्या