🌟शहरातील काही डॉक्टर म्हणतात रुग्ण केवळ दिवसा यावा त्याने आम्हाला भरपूर कमाई द्यावा अन् अर्धवट विलाजानंतर काढता पाय घ्यावा🌟
पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश रणजित) पुर्णा शहरात अहों कसली 'रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा' ? पुर्णा शहरातील डॉक्टर म्हणे रुग्ण केवळ दिवसा यावा अन् त्याने तपासणी फिससह औषधं खरेदीतून भरपूर माल द्यावा अन् अर्धवट विलाजानंतर आमची चिठ्ठी घेऊन सरळ नांदेड परभणीला जावा आणी आर्थिक/शारीरिक/मानसिक दृष्ट्या कमकुवत होऊन अखेरचा राम राम घ्यावा एकंदर अशी दुर्दैवी परिस्थिती पुर्णा शहरातील आरोग्य यंत्रणेची झाली असून दिवसभर असंख्य रुग्णांची अगदी 'नि'स्वार्थ सेवा करुन रात्रीच्यावेळी अगदी गाढ झोपेत जणूकाही इंद्र दरबारी स्वर्गसुखाचा आनंद घेणाऱ्या डॉक्टरांना रात्रीच्या वेळी बिचाऱ्या गंभीर आजारग्रस्त रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांची काय कदर राहणार ? आपआपल्या खाजगी रुग्णालयांमध्ये चोवीस तास सेवेचे फलक लावून गंभीर आजारग्रस्त रुग्णांना रात्रीच्या वेळी वेळेवर उपलब्ध न होणाऱ्या डॉक्टरांना 'रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा' म्हणण्याचा शेवटी काय अधिकार ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होणारी घटना आज रविवार दि.०३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जवळपास ०१.३० ते ०२.४५ वाजेच्या सुमारास घडली.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा शहरातील अली नगर परिसरात राहणारे नसीर कुरेशी (नसीर मॅकॅनिक) यांच्या १७ वर्षीय अफ्फान नामक मुलांची आज रविवार दि.०३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ०१.३० वाजेच्या सुमारास अचानक तब्येत बिघडली तापाने फनफनणाऱ्या आपल्या मुलाचा उपचार व्हावा याकरिता नसीर मॅकॅनिक हे त्याला घेऊन मध्यरात्री ०१.५६ वाजेच्या सुमारास प्रथमतः शहरातील चोवीस तास रुग्ण सेवेचा अधिकृत फलक लावलेल्या पुर्णा हॉस्पिटलमध्ये गेले परंतु याठिकाणी उपस्थित कंपाऊंडरने डॉक्टर साहेब नाहीत असे म्हणून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला यावेळी पुर्णा हॉस्पिटल मधील डॉक्टर पारवे यांना जवळपास दहा ते बारा कॉल केले परंतु डॉक्टर साहेबांनी त्यांचा कॉल काही उचलला नाही यानंतर आपल्या मुलाची परिस्थिती पाहून तळमळणाऱ्या या पित्याने त्याला घेऊन ०२.०० वाजेच्या सुमारास शहरातील कापसे हॉस्पिटल गाठले परंतु याठिकाणी देखील डॉक्टर साहेब नाहीत तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा यानंतर नसीर मॅकॅनिक यांनी आपला आजारी मुलगा अफ्फान याला घेऊन ०२.१० वाजेच्या सुमारास शहरातील आयशा क्लिनिक गाठले परंतु संबंधीत रुग्णालयातील डॉक्टर साहेब कदाचित गाढ झोपेत असावे त्यामुळे नसीर मॅकॅनिक यांनी पाच ते सहा कॉल लावल्यानंतर देखील त्यांनी कॉल उचललेच नाही यानंतर नसीर मॅकॅनिक यांनी आपल्या आजारी मुलाला घेऊन मध्यरात्री ०२.२० वाजेच्या सुमारास शहरातील नवजिवन हॉस्पिटलकडे आपला मोर्चा वळवला परंतु याठिकाणी देखील त्यांना उपचारकामी सहकार्य तर मिळालेच नाही उलट अपमानास्पद वागणूक मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणून या हतबल झालेल्या पित्याने आपला आजारी मुलगा अफ्फान याला घेऊन शहरापासून जवळपास दिड दोन किलोमीटर अंतरावरील पुर्णा-ताडकळस राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाकडे आपला मोर्चा वळवला याठिकाणी उपस्थित परिचारिका व सुरक्षा रक्षक सुर्यकांत वाघमारे यांनी नसीर मॅकॅनिक यांचा आजारी मुलगा अफ्फान यांची परिस्थिती पाहून त्यांच्यावर उपचारासाठी तात्काळ सहकार्य केले यावेळी उपस्थित परिचारिका यांनी अफ्फान याला दोन इंजेक्शन देऊन औषधोपचार केल्याने त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा झाली.
पुर्णा शहरात असंख्य खासगी रुग्णालय असतांना देखील रात्री अपरात्री सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना वेळेवर प्रथमोपचार मिळत नसेल तर या रुग्णांनी शेवटी जायचे कुणाकडे ? असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ही घटना पहिलीच नसून अशा प्रकारे यापूर्वी देखील अनेक रुग्णांना उपचाराअभावी वणवण भटकण्याची वेळ शहरातील या संधीसाधू आरोग्य व्यवस्थेमुळे आल्याचे निदर्शनास आले आहे...
0 टिप्पण्या