परभणी (दि.२७ नोव्हेंबर २०२४) :- परभणी शहरातील गौतम नगर येथिल रहिवाशी असलेले, कार्यसम्राट, दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे, परभणीचे भूमिपुत्र परभणी जिल्हा परिषद वित्त विभागाचे कर्तव्यदक्ष कनिष्ठ लेखाधिकारी मा.धम्मदिप किशनराव भराडे यांना शासकीय नौकरीत जिम्मेदारीने आपले कर्तव्य बजावत सेवा दिल्या बद्दल, भारतीय संविधान जनजागृती तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याच्या कार्याची दखल घेऊन यांना संविधान दिनाच्या औचित्य साधून रुग्णहक्क संरक्षण समिती आयोजित "राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार 2024" हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणी च्या वतीने परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी परभणी शहरातील एसपी ऑफिस समोरील पत्रकार भवन येथे आयोजित केला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. रघुनाथ गावडे यांच्या हस्ते वितरित होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजि. आर.डी.मगर हे तर उद्घाटक परभणी जिल्हाधिकारी मा. रघुनाथ गावडे हे असणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सत्ता इनामदार, ऍड.निलेश करमोडी, हनुमंत गोत्राळ, शिवाजीराव चव्हाण, रेणुकाताई बोरा, अनिताताई सरोदे, हाजी शरीफ शेख, खदीरलाल हाश्मी, शरीफ चारठाणकर, तब्बू पटेल, प्रमोद कुटे, प्रमोद अंभोरे, महबूब शेख, वाजिद खान पठाण, शिवशंकर सोनवणे हे असणार आहेत. या पुरस्कार निवडीचे पत्र दिनांक 26 नोव्हेंबर रोजी पुरस्कार सोहळ्याचे आयोजक दिलीप बनकर व शेख सरफराज तसेच वंचित बहुजन आघाडीचे परभणी तालुका अध्यक्ष (उत्तर विभाग) प्रमोद अंभोरे हस्ते दम्मदीप भराडे यांना देण्यात आले आहे. यावेळी अनुदानित वसतिगृह कर्मचारी पवन मोरे, उत्तम भाग्यवंत, गायकवाड साहेब, ऍड. सुदर्शन पौळ, प्रमोद अंभोरे आदींची उपस्थितीत होती.
हा 'राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार 2024' धम्मदीप भराडे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या वर सर्वच क्षेत्रातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.....
0 टिप्पण्या