🌟परभणी जिल्हा दलित पँथरच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी पंचागे यांची निवड....!


🌟संभाजी पंचागे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आला सत्कार🌟 

परभणी (दि.०३ नोव्हेंबर २०२४) :- दिन,दलित,दुबळे,कष्टकरी, कास्तकरी यांच्यावर होणारे अन्याय रोखण्यासाठी 1972 -73 साली कालवश पद्मश्री नामदेव (दादा) ढसाळ यांच्या नेतृत्वात स्थापन केलेली दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदी सेवानिवृत्त पी.आय. तथा सामाजिक कार्यकर्ते संभाजी पंचांगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, समाजहित अभियान प्रतिष्ठान, रुग्णहक्क संरक्षण समिती, मुस्लिम विकास परिषद, रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी, जनसहयोग सेवाभावी संस्था, खिदमादगार सेवाभावी संस्था, भिमाकोरेगाव मित्र मंडळ आदी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी डॉ.आंबेडकर नगर येथील लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ कार्यालय येथे सत्कार करून संभाजी पंचांगे यांना पुढील सामाजिक कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी संभाजी पंचांगे, दिलीप बनकर, मेहमूद खान, प्रमोद अंभोरे, शेख सरफराज, यशवंत सोनवणे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. 

 यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तथा रुग्णहक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, मराठवाडा संघटन प्रमुख डिझिटल मीडिया वाजेद खान, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान चे प्रमोद अंभोरे, रुग्णहक्क संरक्षण समिती तथा मुस्लिम विकास परिषद चे परभणी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, परभणी तालुकाध्यक्ष युसूफ बोगानी कच्ची, महिला संघटक वैशाली साळवे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मेहमूद खान, सेवा निवृत्त पी. एस.आय. तथा दलित पँथर चे परभणी जिल्हा अध्यक्ष संभाजी पंचागे, सामाजिक कार्यकर्ते युवा नेते यशवंत सोनवणे, रितेश साबळे, कैलास गरुड, शंकर बनसोडे, सिद्धार्थ शिंगारे, शेख इसाक, हरदीप सिंग बावरी, संदीप वायवळ, शेख कलीम आदींचा सहभाग होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या