🌟यावेळी मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते🌟
परभणी (दि.१५ नोव्हेंबर २०२४) :- परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत परभणी शहरातील क्रांतिवीर लहूजी साळवे नगरात आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच बसस्थानक परिसरात साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यासाठी मोलाचं योगदान दिलं ही संपूर्ण मातंग समाजासाठी आभिमानाजी बाब आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघात आमदार डॉ. राहुल पाटील यांनी वेळोवेळी मातंग उन्नतीसाठी कार्य केल्याने त्यांना आज शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी मातंग समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी प्रा.मिलिंद आव्हाळ,विश्वनाथ गवारे, माऊली साळवे,चांदु बोराडे,गणपत सुतारे,पप्पुराज शेळके,रविदास नेटके, अशोक शिंदे,निवृती नितनवरे,शेषेराव सावळे,रुस्तुम पारडे,विठ्ठल सावळे,सचिन गायकवाड,बाबा सुतारे,सुनील रणबावळे,माणिक पवार,विश्वनाथ कसबे,शिवा काळदाते,रमेश काळदाते,महेंद्र गायकवाड,चांदू पाचपुंजे,बळीराम मालसमद्र,सुधाकर कडवे,अनिल कांबळे,संजय शिंदे आदींसह मातंग समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती....
0 टिप्पण्या