🌟परभणी महानगर पालिका करणार अनाधिकृत होर्डिंग्ज विरोधात कठोर कारवाई....!


🌟महानगर पालिका आयुक्तांचा इशारा : दंडात्मक कारवाई होणार🌟

परभणी (दि.२२ नोव्हेंबर २०२४) : महानगरपालिका हद्दीत कोणत्याही नागरीक, वाणिज्य संस्था, जाहिरात संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, राजकीय पक्ष आदींनी महानगरपालिका प्रशासनाच्या परवानगीशिवाय होर्डिंग,बोर्ड, बँनर,पोस्टर, किऑक्स, झेंडे, भित्तीपत्रके उभारु नये असे आवाहन आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केले आहे.

            मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित जनहित याचिका १५५/२०११ च्या अनुषंगाने न्यायालयाने वेळोवेळी विस्तृत आदेश पारित केलेले आहेत. त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय होर्डिंग, बोर्ड, बँनर, पोस्टर, किऑक्स, झेंडे, भित्तीपत्रके उभारता येणार नाहीत. महानगरपालिकेने होर्डींग, बॅनर उभारण्यासाठी जागा निश्‍चीत केलेल्या आहेत या निश्‍चित केलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात होर्डिंग, बॅनर, पोस्टर उभारण्यासाठी महानगरपालकेमार्फत ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच विनापरवानगी लावण्यात आलेल्या होर्डिंग, बॅनर, पोस्टर वर प्रभाग समिती कार्यालयाचे पथकामार्फत कार्यवाही करून रुपये १०० प्रती होर्डिंग, बॅनर, पोस्टरनुसार दंड वसूल करण्यात येणार आहे.

            तसेच विनापरवानगी फलक होर्डिंग,बोर्ड,बॅनर,पोस्टर, किऑक्स, झेंडे, भित्तीपत्रके लावल्याचे आढळून आल्यास संबधीतावर महानगरपालिका अधिनियमाचे कलम २४४,२४५ महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम २०२२ मधील तरतुदींनुसार आणि महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५ नुसार दंड / गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या