🌟सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांचे प्रतिपादन🌟
परभणी/सोनपेठ : पाथरी विधानसभा मतदारसंघाला आता आमदार राजेश विटेकर यांच्या रूपाने हक्काचा आमदार लाभल्याने सोनपेठ शहरासह मतदारसंघांतर्गत खुटलेल्या विकासाचा मार्ग निश्चितच खूला होईल असा आशावाद सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी व्यक्त केला.
मागील जवळपास पंचवीस वर्षांपासून या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळेच सर्वांगिण विकासाचा मार्ग पूर्णतः खुंटला होता. त्यामुळेच या सार्वत्रिक निवडणूकीत सर्वसामान्य मतदारांना परिवर्तन घडवायचेच होते नव्या उमेदीचा व्यापक दृष्टीचा नवा चेहरा म्हणून सर्वसामान्य मतदारांनी आमदार राजेश विटेकर यांना या निवडणूकीतून मोठा कौल दिला त्यांच्या रुपाने या पाथरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण परभणी जिल्ह्यास सुध्दा एक युवा नेतृत्व लाभले आहे. त्यामुळेच सोनपेठ शहरासह पाथरीसही हक्काचा आमदार मिळाला आहे. त्यामुुळे सोनपेठ शहरांतर्गत व पाथरी मतदारसंघांतर्गत खुंटलेल्या विकासाची कामे या पाच वर्षात मार्गी लागणार हे स्पष्ट आहे, असे ते म्हणाले. सोनपेठ शहरासाठी मुदगल बंधार्यातून नवीन पाणी पुरवठा योजना, स्थानिक खेळाडू उभे रहावे म्हणून भव्य क्रिडा संकुल, नगरपालिकेकरीता नवीन इमारत, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, मूलभूत सोयी सुविधांचे सारे प्रश्न व मुस्लिम बांधवांच्या क्रबस्तानाकरीता सुरक्षा भिंतीसह अन्य प्रश्न मार्गी लागतील असे ते म्हणाले....
0 टिप्पण्या