🌟पुर्णा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राज उर्फ गोविंद ठाकर यांनी दिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा......!


🌟माफ करा राजसाहेब पण् आपण कायम हृदयात असाल - राज उर्फ गोविंद ठाकर


पुर्णा :- पुर्णा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तथा धाडसी व कर्तबगार सामाजिक कार्यकर्ते राज उर्फ गोविंद ठाकर यांनी आपल्या मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवला असून या राजीनामा पत्रात त्यांनी राज ठाकरे यांना उद्देशून अशी भावनिक साद घातली आहे की माफ करा राजसाहेब पण् आपण माझ्या कायम हृदयात असाल.

पुर्णा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष राज उर्फ गोविंद ठाकर यांनी श्री. राजसाहेब ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात असे नमूद केले आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापनेपासून आपल्या पक्षात इमानेइतबारे कार्य करत असून सुरुवातीला शाखाध्यक्ष,शहर उपाध्यक्ष,शहर सचिव व नंतर शहर अध्यक्ष अशी पद घेऊन पक्षाला योग्य ते न्याय दिला व पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली परंतु आजच्या परिस्थितीनुसार पक्षाला वेळ व पदाला न्याय देऊ शकत नाही म्हणून माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी माझ्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पदमुक्त होत आहे व शेवटपर्यंत महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत राहील पुढं त्यांनी असं ही नमूद केल आहे की पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक यांनी खूप प्रेम दिलं, माझ्या मनात आपल्या बद्दलचा जिव्हाळा कायम राहील...कधी चुकून अथवा जाणूनबुजून कोणाचे मन दुखावले असले तर दिलगिरी व्यक्त करतो त्यांनी आपला राजीनामा मनसे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे देखील पाठवला आहे......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या