🌟परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात ५६ टेबल व ११८ मतमोजणीच्या फेर्‍या होणार....!


🌟जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती🌟 


परभणी (दि.२१ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर,गंगाखेड व पाथरी या चारही विधानसभा मतदारसंघात एकूण ५६ टेबलवर ११८ मतमोजणीच्या फेर्‍या होणार असल्याची माहिती परभणी जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज गुरुवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून मतमोजणी संदर्भात तपशीलवार माहिती दिली.

      जिंतूर विधानसभा मतदारसंघात एकुण ४३८ मतदान केंद्र असून ईव्हीएम मतमोजणीकरीता १४ टेबल असणार आहेत तर मतमोजणीच्या ३२ फेर्‍या होणार आहेत पोस्टल मतमोजणीकरीता ०७ टेबल व ईटीपीबीएस मतमोजणीकरीता ०१ टेबल असणार आहे तर परभणी विधानसभा मतदारसंघात एकुण ३३८ मतदान केंद्र असून ईव्हीएम मतमोजणीकरीता १४ टेबल असणार आहेत तर मतमोजणीच्या २५ फेर्‍या होणार आहेत पोस्टल मतमोजणीकरीता ०६ टेबल व ईटीपीबीएस मतमोजणीकरीता ०१ टेबल असणार आहे.

        गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकुण ४३२ मतदान केंद्र असून ईव्हीएम मतमोजणीकरीता १४ टेबल असणार आहेत तर मतमोजणीच्या ३१ फेर्‍या होणार आहेत पोस्टल मतमोजणीकरीता ०८ टेबल व ईटीपीबीएस मतमोजणीकरीता ०२ टेबल असणार आहे तर पाथरी विधानसभा मतदारसंघात एकुण ४१५ मतदान केंद्र असून ईव्हीएम मतमोजणीकरीता १४ टेबल असणार आहेत. तर मतमोजणीच्या ३० फेर्‍या होणार आहेत. पोस्टल मतमोजणीकरीता ०७ टेबल व ईटीपीबीएस मतमोजणीकरीता ०१ टेबल असणार आहे.

          एकूण चार मतदारसंघातील ०१ हजार ६२३ मतदान केंद्र, मतमोजणीकरीता ५६ टेबल व मतमोजणीच्या फेर्‍यांची संख्या ११८ असणार आहे. पोस्टल मतमोजणी करीता २८ टेबल व ईटीपीबीएस मतमोजणीकरीता ०५ टेबल असणार आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या