🌟वाशिम येथे मतदार जागृतीसाठी रॅली ; वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....!


🌟जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दाखविली हिरवी झेंडी : सर्वदूर मतदानाचा जागर🌟

🌟मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत पथनाट्य व फ्लॅशमॉब उपक्रम उत्साहात🌟

🌟आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

फुलचंद भगत

वाशिम : ‘वाढवू तिरंग्याची शान, करू देशासाठी मतदान’, ‘जागरूक मतदार, बळकट लोकशाही’ अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेल्या  रॅलीला वाशिमकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी हिरवी झेंडी दाखवीली.

 मतदान प्रक्रिया ही लोकशाहीला परिपक्व करणारी आहे आपले मतदान आपले अधिकार वापरणे हे आपले अस्तित्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे त्यामुळे २० नोव्हेंबर  रोजी वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपल्या अधिकार बजावून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.मतदानाचा दिवस हा सण आणि उत्सव सारखा साजरा करावा. प्रत्येका मतदाराने स्वतःही मतदान करावे आणि आपल्या ओळखीतल्या सर्व पात्र मतदारांना मतदान करण्यास प्रेरित करावे असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. 

जिल्हा प्रशासन निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे यापूर्वी गृह मतदानाच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून मतदान करून घेतले तसेच कर्तव्यावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनीही  पोस्टल बॅलेटच्या द्वारे झालेल्या मतदानातून आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहेत.

मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी, लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या संकल्पनेतून ‘स्वीप’अंतर्गत नगरपरिषद आणि जिल्हा स्वीप समितीच्यावतीने ‘ ही  रॅली काढण्यात आली. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, मुख्याधिकारी नप निलेश गायकवाड, तहसीलदार निलेश पळसकर ‘स्वीप’चे नोडल अधिकारी जीवन आढाव यांची प्रमुख उपस्थित होती.

नगरपरिषद कार्यालयापासून रॅलीची सुरूवात झाली. पुढे अकोला नाका, पाटणी चौक, कामगार नाका, आंबेडकर चौकात येऊन समारोप झाला.मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आयोजित रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदानाबाबत विविध फलक, घोषणा व पथनाट्याद्वारेही जनजागृती करण्यात आली. ‘मी जागरूक मतदार, मी मतदान करणारच’'मतदार राजा जागा हो' असे घोषवाक्य लिहून उभारलेले स्वाक्षरीफलकही लक्षवेधी ठरले. एनसीसी शिक्षक अमोल काळे यांनी संयोजन केले. रॅलीत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या