🌟परभणी जिल्हा शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र....!


🌟विधानसभा निवडणूकी दरम्यान जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांनी दिला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा🌟

परभणी (दि.१० नोव्हेंबर २०२४) :- परभणी जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय नारायणराव साडेगावकर यांनी काल रविवार दि.१० नोव्हेंबर रोजी ऐन विधानसभा निवडणुकी दरम्यान आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेना उबाठा गोटात खळबळ माजली आहे.

          शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांनी परभणी जिल्ह्याचे खासदार तथा शिवसेना उपनेते संजय उर्फ बंडू जाधव यांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की मी शिवसेना जिल्हाप्रमुख या पदावर कार्यरत आहे मात्र काही कारणास्तव माझी पक्षात काम करण्याची ईच्छा नसल्या कारणाने मी स्वःखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देत आहे राजीनामा स्विकारुन मला पदावरुन कार्यमुक्त करावे असेही त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

             दरम्यान, विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत साडेगावकर यांनी दिलेल्या या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीस विशेषतः सेलू-जिंतूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला हा धक्का मानला जात असून साडेगावकर आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या