🌟 महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟ओबीसी व दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट : केंद्रीय गृहमंत्री अमीत शाहांचा गंभीर आरोप 

💫 शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा ; भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना 

💫 प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, मासिक पाळीच्या 2 दिवस रजा; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा ; लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआकडून नवी योजना 

💫 पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्जमाफी करणार नाहीत ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  ; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही विचारले प्रश्न! 

💫 ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट ; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा गंभीर आरोप ; ज्यांना चक्की पिसायला पाठवणार होते, त्यांना जवळ घेऊन बसलात, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल  

💫 खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! लाडक्या बहिणींबाबत केलेल्या विधानावरून निवडणूक आयोगाने धाडली नोटीस ; लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणच तुम्हाला धडा शिकवेल, आमदार बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार ; लाडकी बहीण योजनेवरुन असे बोलणे चुकीचे, धनंजय महाडिक यांच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे परखड मत 

💫 पोर्शे कार अपघाताप्रकरणात नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन... आमदार सुनील टिंगरेंनी शरद पवारांना पाठवलेली नोटीस ; सुनील टिंगरेंनी जर नोटीस पाठवली असेल तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करा, खासदार सुप्रिया सुळेंच्या टिकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर  

💫 मी संधीसाधू तर शरद पवार कोण हे त्यांना सांगावंच लागले, शरद पवारांच्या टीकेला भाजप खासदार अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर  ; 'अजित पवारांची दादागिरी नही चलेगी नही चलेगी', जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण 

💫 आधी सोबत प्रचार, मग ओळख अन् सिक्रेट मिटिंग; अपहरण करून विवस्त्र महिलेसोबत फोटो अन् 10 कोटींची केली मागणी, शिरुरचे आमदार अशोक पवारांच्या मुलाने सांगितली हकीकत 

💫 निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील विक्रोळीत व्हॅनमध्ये सापडल्या 6500 किलो चांदीच्या विटा, गोदामात नेण्यात येत असल्याची माहिती; पोलिसांकडून तपास सुरू

💫 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज! सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी सज्ज  ; भारतविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी केली संघाची घोषणा

  ✍️ मोहन चौकेकर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या