🌟पाथरी तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सच्या गळीत हंगामाचा आज संचालक ॲड देशमुखांच्या हस्ते शुभारंभ...!


🌟यावेळी कारखाण्याचे चेअरमन माजलगावचे माजी आ.आर.टी देशमुख जिजा यांची उपस्थिती असणार🌟

पाथरी :- पाथरी तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स प्रा.लि. या साखर कारखाण्याच्या २३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एम टी नाना देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती या साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक ॲड रोहित आर देशमुख यांनी दिली या वेळी प्रमुख उपस्थितीत एच टी देशमुख, जे टी भाऊ देशमुख,या साखर कारखाण्याचे चेअरमन माजलगावचे माजी आ. आर टी देशमुख जिजा यांची उपस्थिती असणार आहे. 


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व गोपिनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात या साखरकारखाण्याचे संस्थापक स्व अशोक सेठ सामत यांनी २००१ साली केवळ अकरा महीण्यात उभारणी केली. चाचणी हंगाम वगळता या वर्षीचा हा तेविसावा गळीत हंगाम सलग सुरू आहे. सुरुवातीला एक हजार मेट्रीक टन गाळप क्षमता असलेल्या या साखर कारखाण्याची गाळपक्षमता आता प्रतिदिन दोन हजार पाचशे मेट्रीकटन करण्यात आलेली असून पुढील हंगामात तीन हजार पाचशे मे.टन गाळप क्षमता करण्या साठी या साखर कारखाण्याचे व्यवस्थापन प्रयत्न करत आहे.

या भागात पाण्याची उपलब्धता मुबलक असल्याने ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते.आताचा रेणूका शुगर्स पुर्वीचा गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना अवसायानात निघाल्या नंतर या भागातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार, व्यापारी यांच्या जिवनात क्रांतिकारी बदल घडवण्यात योगेश्वरी शुगर्स परिवाराचे मोठे योगदान राहिले आहे. तब्बल चोविस वर्षा पासुन कितीही अडचनी असल्या तरी योगेश्वरी शुगर्स ने सातत्याने ऊसाचे गाळप करून या भागातील शेवटच्या शेतक-याच्या उसाचे गाळप करेपर्यंत कारखाण्याची चाके फिरवत ठेवली.सहा वर्षा पुर्वी  देशमुख परिवारा कडे या साखर कारखाण्याची सुत्रे आल्या नंतर त्यांनी कार्यक्षेत्र वाढवत प्रतिदिन गाळप क्षमता वाढवण्या कडे लक्ष केंद्रित करत शेतकरी कामकारांचे ही हित जोपासले आहे. या वर्षी चा हा २३ वा गळीत हंगाम आज बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एम टी नाना देशमुख यांच्या शुभहस्ते काटा पुजन झाल्या नंतर विधिवत ऊसाच्या मोळीचे पुजन करून  प्रत्यक्ष गव्हाणीत मोळी टाकुन हंगामाची सुरूवात होणार आहे.

या कार्यक्रमा साठी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, तोडणी वाहतुक ठेकेदार, कर्मचारी यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन कार्यकारी संचालक ॲड रोहित आर देशमुख,संचालक राहुल आर देशमुख, डॉ अभिजित आर देशमुख, संचालक, प्रवर्तक मंडळ ,अधिकारी, कर्मचारी यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या