🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालुक्यामधील शेतकऱ्यांचे थंडीच्या दिवसातही शेतात जागरण......!


🌟शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जंगली रानडुक्कर रोही आदी प्राणी करताय पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- शेतकऱ्यांच्या शेतामधील कापूस फुटायला सुरुवात झाली आहे मग कापूस वेचनीला मजूर मिळत नसल्याने शेतातील फुटलेल्या कापसाठी राखण करण्यासाठी शेतकरी शेतात जागरण करीत आहे कापूस चोरीच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.गत काही दिवसापासून व बरेच वर्षापासून मंगरूळपीर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये हरभरा पेरणी व गहू पेरणी केली आहे. 

तालुक्यामधील पारवा सर्कल मधील शेतकरी बांधव व तसेच मंगळसा वाडा फार्म  गावातील शेतकरी शेतामध्ये आपल्या पिकाची रानटी प्राणी नासधूस करत आहे शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये जागरण करीत आहे वाढा गावांमधील शेतकरी नाजीर खान ,शेख नमो ,सोहेल खान ,भारत भगत,सलीम सलाम खान ,जावेद खान, साजिद खान ,भीमराव भगत, यांनी आपल्या शेताची हरभरा पिकाची पेरणी केली व अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जंगली रानडुक्कर व तसेच रोही प्राणी शेतकऱ्यांच्या पिकाची नास दूस करत आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या