🌟पाथरीकरांनों ‘साथ द्या,विकास साधा’ पाथरीत ०४ हजार कोटींची विकास कामे करु - अजित पवार


🌟मानवतमध्ये आज महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची सभा संपन्न🌟 


परभणी पाथरी (दि.१३ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आज मंगळवार दि.१३ नोव्हेंबर रोजी मानवत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की विकासात्मक योजना राबविण्याकरीता धमक आणि ताकद असावी लागते तरच कामे होतात. ज्यांच्या अंगात पाणीसुध्दा नाही ते तुम्हाला काय देणार ? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत पाथरीकरांनो या विधानसभा निवडणूकीतून महायुतीला साथ द्या पाच वर्षात या मतदारसंघात चार हजार कोटींची विकास कामे करुन दाखविल असा दावा केलाही त्यांनी केला.

                 पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत महायुतीचे उमेदवार तथा आमदार राजेश विटेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी दि.१३ मानवत शहरात सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवार विटेकर, प्रथम महापौर प्रताप देशमुख, अनिलराव नखाते, सौ. भावना नखाते, भाजपाचे नेते विलास बाबर यांच्यासह अन्य नेते व्यासपीठावर विराजमान होते. या सभेत दादासाहेब टेंगसे, संजयराव रनेर यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात प्रवेश केला आपल्या भाषणातून पवार यांनी, राजकारण असो समाजकारणात आपण शब्दास कटिबध्द राहिलो आहोत. गेल्या लोकसभा निवडणूकीत रासपला जागा सोडतेवेळी राजेश विटेकर यांना थांबण्याचा सल्ला दिला. पाठोपाठ सहा महिन्यात आमदार करु, असा शब्द दिला. तीन महिन्याच्या आत तो शब्द पाळला, असे नमूद केले.

             या विधानसभा निवडणूकीतून विटेकर यांना सन्मानाने विधानसभेवर पाठवा, असे आवाहन करतेवेळी या मतदारसंघाच्या विकासात्मक वाटचालीकरीता विटेकर हे निवडून येणे नितांत गरजेचे आहे, असे स्पष्ट केले. परभणी जिल्हा विकासात्मक कामात खूप मागे राहिला आहे. निष्क्रिय लोकप्रतिनिधींची परंपरा त्यास कारणीभूत आहे. आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी विकास कामांना कधीच प्राधान्य दिले नाही. मूळात त्यांच्यातच ती दृष्टी कधी दिसलीच नाही. विकास योजना राबविण्याकरीता मोठी धमक, ताकद असावी लागते. तरच कामे होतात. ज्यांच्या अंगातच पाणी नाही, ते तुम्हाला काय देणार असा सवाल करतेवेळी पवार यांनी आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला विकास काय असतो, तो करुन दाखवू, आमच्यात रग आहे. आमच्यात हिम्मत आहे. प्रशासनावर आमची पकड आहे. त्यामुळे सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने जे काही करता येईल ते निश्‍चितपणे करु, असा विश्‍वास व्यक्त केला. पाथरीकरांनो, साथ द्या पुढील पाच वर्षात या मतदारसंघात 4 हजार कोटींची विकास कामे करु, असे आश्‍वासन देतेवेळी पवार यांनी या मतदारसंघांतर्गत गोदावरी दुधना सहकारी साखर कारखान्या पुनर्जीवनाकरीता आपण प्रयत्न करु, या कारखान्याची गाळप क्षमता वाढवू, तसेच ऊस उत्पादकांना दिलासा मिळावा या दृष्टीने स्वतः प्रतिष्ठा पणास लावू, असा विश्‍वासही व्यक्त केला. संत साईबाबा यांच्या या भुमीच्या विकास आराखड्याकरीता आपण अर्थमंत्री या नात्यातून पैसा देवू, पाथरीचा कायापालट करु, तीर्थक्षेत्र नृसिंह पोखर्णीस पर्यटनाचा दर्जा देवू, तसेच पैठणच्या जलाशयातून लाभ क्षेत्रापासून कोसोदूर राहणार्‍या 54 गावांना सिंचनाकरीता पाणी उपलब्ध करुन देवू, गोदावरी नदीवरील बंधार्‍याच्या पाण्यातून पिण्यासह सिंचनाचे प्रश्‍न मिटवू, तसेच पाथरी मतदारसंघांतर्गत रस्ते, भूमिगत गटारे व अन्य विकास कामे मार्गी लावू, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.

              परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून यश गरजेचे आहे. कारण, महायुती सत्तारुढ झाल्यास केंद्र सरकारद्वारे सर्वतोपरि मदतीचा हात मिळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे सर्वांगिण विकासाकरीता पैसा कमी पडणार नाही, केवळ पाठपुरावा करावा लागेल, कामे मार्गी लागत राहतील, असा विश्‍वास व्यक्त करतेवेळी पवार यांनी विरोधी पक्षाच्या निगेटिव्ह प्रचारावर, अपप्रचारावर व खोट्या भूलथापांना कोणीही बळी पडू नका, या मंडळींनी सातत्याने सामान्य मतदारांना ऐनकेन प्रकारे झुलविण्याचे काम सातत्याने केले आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने संविधानासह आरक्षणाबद्दल चकारही बोलू नये कारण आंबेडकरी चळवळीस, विधारधारेस छेद देण्याचे काम सातत्याने केले आहे असे ते म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या