🌟सभागृहाचा बांधकाम भुमीपुजनाच्या पार्श्वभूमीवर श्री.हभप.विलास महाराज गेजगे यांच्या हरिकिर्तनाचे देखील आयोजन🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील खडकपुरा गल्लीतील संत शिरोमणी श्री.सावतामाळी मंदिराच्या विस्तारीत सभागृहाचा बांधकाम भुमीपुजन सोहळा उद्या रविवार दि.०३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० ते ११.०० वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आला आहे.
संत शिरोमणी श्री.सावतामाळी मंदिराच्या विस्तारीत सभागृहाचा बांधकाम भुमीपुजनाच्या पार्श्वभूमीवर श्री.हभप.विलास महाराज गेजगे यांच्या हरिकिर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला समाज बांधवासह तमाम गंगाखेड नगरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांसह समस्त माळी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.......
0 टिप्पण्या