🌟मानवत नगर परिषद प्रशासनाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी केली वाहनाची सोय....!


🌟अशी माहिती मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी दिली🌟

परभणी/मानवत (दि.१८ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता बुधवारी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे त्या अनुषंगाने मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी येण्या-जाण्यासाठी मानवत नगर परिषद प्रशासनाने वाहनाची व्यवस्था केलेली आहे अशी माहिती  मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी दिली.

               निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ (सुधारित) मधील तरतुदी नुसार जे दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर स्वतः हून येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर नेण्याची व परत आणून सोडण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क करून सक्षम ऍपवर येणार्‍या रिक्वेस्ट व तक्रारीनुसार अशा मतदारांना मतदान केंद्रावर येण्या-जाण्यासाठी मानवत नगर परिषदेने वाहनाची व्यवस्था केलेली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या