🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन / बातम्या......!

🌟अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं🌟

💫 मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही ; उभे केलेल्या उमेदवारांना भरलेले अर्ज मागे घेण्याचे आदेश सुचना,सत्ताधाऱ्यांना सोडणार नाही मनोज जरांगे यांचे वक्तव्य ; रिंगणात वाघाचं काळीज लागतं, मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेताच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल 

💫 अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महाविकास आघाडीच्या मागणीला यश ; महाविकास आघाडीने, नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाकडे रश्मी  शुक्ला यांना हटविण्याची  मागणी केली होती ;मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार 

💫 कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपतींचा उमेदवारी अर्ज माघे,सतेज पाटलांना मोठा धक्का ; दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद... मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर शाहू महाराजांच्या निकटवर्तीयांवर सतेज पाटील भडकले ; यांच्यासमोर सही कर,शाहू महाराजांचा आदेश,मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंना खेचून बाहेर आणले व उमेदवारी अर्ज मागे घेतला 

💫 माहीम विधानसभेत सदा सरवणकरांची माघार नाहीच,भेटीसाठी आलेल्या सदा सरवणकरांना राज ठाकरेंनी घरातही घेतलं नाही, मुलाकडून संदेश पाठवून म्हणाले तुम्हाला लढायचं तर लढा ; आम्ही मागे घ्या अशी विनंती केलीच नव्हती, सदा सरवणकरांच्या भूमिकेनंतर मनसे आक्रमक 

💫 बोरिवलीतून गोपाळ शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज मागे,विनोद तावडेंच्या शिष्टाईला यश ; चिंचवडमधील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना दिलासा, नाना काटेंनी उमेदवारी मागे घेतली 

💫 शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटलांची डोकेदुखी वाढली,स्पेशल विमान पाठवूनही भाजपचे बंडखोर डॉ.राजेंद्र पिपाडा यांची माघार नाहीच, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई निष्फळ 

💫 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टरने अजितदादांच्या देवळालीच्या उमेदवार सरोज आहेर यांच्याविरोधात एबी फॉर्म पाठवले, पण ऐनवेळी बंडखोरांना माघार घ्यायला लावली 

💫 मावळ पॅटर्नमुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा गेम होण्याची चर्चा,राज ठाकरेंच्या मनसेचाही पाठिंबा,अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा दावा ; देवेंद्र फडणवीसांनी प्रचार केला तरी मावळ पॅटर्न राबवणारच, बाळा भेगडेंनी दंड थोपटले 

💫 विधानसभेच्या निकालानंतर काय होईल सांगता येत नाही,शरद पवार-एकनाथ शिंदेचं काहीतरी चाललंय; नवाब मलिकांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

💫 पुण्यात निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न,दृष्टीहीन उमेदवार विनायक ओव्हाळ पोलिसांच्या ताब्यात  

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या