🌟ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ.बाबा आढाव यांच्या उपोषणास परभणीतून पाठींबा....!


🌟भारत जोडो अभियानचे प्रशासनास निवेदन🌟

परभणी (दि.३० नोव्हेंबर २०२४) : पुणे येथील फुले वाड्यामध्ये २८ नोव्हेंबर २०२४ पासून ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ.बाबा आढाव यांनी तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषणास सुरुवात केली असून या उपोषणाला पाठींबा म्हणून परभणीमध्ये काल शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर २०२४ एक दिवसीय उपोषण करत भारत जोडो अभियानकडुन जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

          भारत जोडो अभियानचे समन्वयक डॉ.सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली साथी रामराव जाधव,एन.आय.काळे,दिगंबर जाधव, काँग्रेस मीडिया सेलचे सुहास पंडित,स्वराज इंडियाचे गोविंद गिरी, उस्मान शेख, सत्यनारायण खटिंग, एस. डी. ठोंबरे, लक्ष्मण गायकवाड, अरुण हरकळ, मितेश सुक्रे, अनिल अहिरे, संजय बागते आदींनी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले. त्याद्वारे, सत्ता, संपत्ती जात व धर्मद्वेषाआधारे दररोज लोकशाहीचे वस्त्रहरण होत असून या विरोधामध्ये डॉ. बाबा आढाव व त्यांच्या समर्थकांनी पुणे फुलेवाडा येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त 28 नोव्हेंबरपासून तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. शाश्‍वत कायदा न करत जनतेला भुलविणार्‍या योजना आणत, सत्तेचा दुरुपयोग करत, संविधानात कष्टकरी, वंचित वर्गाचे अधिकार पायदळी दररोज तुडवले जात आहेत. संविधानाच्या प्रस्तावनेचा बळी दिल्या जात आहे. संविधानाला कमजोर करण्यात येत आहे. मोजक्या उद्योगपतींच्या हाती देश विकल्या दिल्या जात आहे, असे या निवेदनात नमूद केले.  दरम्यान, या सर्व प्रकारास विरोध म्हणून शुक्रवारी परभणीत एक दिवस उपोषण करत  डॉ. आढाव यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या