🌟परभणी जिल्ह्यात विधानसभा मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी याकरिता तगडा पोलीस बंदोबस्त.....!


🌟जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात अधिकारी कर्मचार्‍यांचा व विशेष दलाचा मोठा फौजफाटा तैनात 🌟

परभणी (दि.१९ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील परभणी,पाथरी,जिंतूर गंगाखेड या चारही विधानसभा मतदारसंघातील मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडल्या जावी या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभाग व जिल्हा पोलिस प्रशासनाने या चारही विधानसभा मतदारसंघात अधिकारी कर्मचार्‍यांचा व विशेष दलाचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

  (परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केलेले आवाहन)

  सीएपीएफच्या तीन कंपन्या व एक प्लाटून या जिल्ह्यात मतदानाच्या टप्प्याकरीता दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ एसएसपीएफची एक कंपनी, दोन प्लाटून तैनात करण्यात आले असून जिल्ह्यात या व्यतिरिक्त 1 हजार 738 पोलिस अधिकारी व कर्मचारी, 1 हजार 417 होमगार्ड मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या