🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟
पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल ; शरद पवार

💫 पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल ; शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत ; बारामतीत बोलताना शरद पवारांचे मोठे वक्तव्य ; एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता ? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल 

💫 गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासपा उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी उमेदवाराला इशारा : विशाल कदम धमक्या देणे बंद करा परभणीसह सर्वांना माहीत आहे रत्नाकर गुट्टे काय चीज आहे 

💫 सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी मधुरिमाराजेंचा अर्ज मागे, कोल्हापूर उत्तर प्रकरणावर शाहू महाराजांचे स्पष्टीकरण, सतेज पाटलांकडून अपमान नाही, विरोधकांनाही उत्तर ; सतेज पाटलांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला, निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

💫 कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते डाळीसह किराणा मालाचे स्थिर भाव ; गुजरातच्या सूरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, कोल्हापुरात उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

💫 माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार ; शिवसेनेच्या सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला अजिबात आव्हान वाटत नाही 

💫 मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार,पण धाराशिव जिल्ह्यातील दोन मराठा उमेदवारांची वेगळीच चाल,आदेश डावलत शड्डू ठोकला ; उमेदवारांची यादी हे माघार घेण्याचं कारण नव्हे, राजरत्न आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ ; म्हणाले, मनोज जरांगेंवर कोणाचा दबाव आहे का ? 

💫 माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा हादरा, अपक्ष अर्ज भरुन निवडणुकीच्या मैदानात ; लोकसभेप्रमाणे  विधानसभेतही रंगणार 'सांगली पॅटर्न',  सांगली लोकसभात रंगलेल्या सांगली पॅटर्न प्रमाणेच सांगली विधानसभा मतदारसंघात देखील रंगणार   सांगली पॅटर्न; अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचे खासदार विशाल पाटल यांचे आवाहन 

💫 सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सेवानिवृत्तीच्यादिवशी मोठा निर्णय घेण्याची शक्यता,शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी ;  शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली 

💫 हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवलेल्या नाशिकच्या देवळाली मतदारसंघातील नॉट रीचेबल राजश्री अहिररावांचा अजब दावा, म्हणाल्या मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते, मला काहीच माहिती नाही ; राज ठाकरे म्हणाले शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी; दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्यांनाच प्रॉपर्टी मिळणार 

💫 तिकीट मिळालं नाही तेव्हा उद्धव ठाकरे, रश्मी वहिनींचा फोन आला, पूनम महाजन यांनी उलगडलं ठाकरे-महाजन कुटुंबीयांचं नातं ; काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, मात्र आनंद भाजपाला, अतुल सावेंनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये भेटीची चर्चा

💫 भाजप नेते अरुण जेटलींचा मुलगा रोहन जेटली अमित शहा यांचे पुत्र जय शाहांची जागा घेणार; बीसीसीआयच्या सचिवपदी वर्णी लागण्याची शक्यता

💫 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच अभिनेते भाऊ कदम यांनी व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं 

💫 नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या