🌟नांदेड येथील शीख समाजातील वयोवृद्ध महिला जवालाकौर बुंगाई यांचे वृद्धापकाळाने निधन....!



🌟त्यांच्या मागे कुटुंबात एक मुलगा,सुन,पाच मुलीं,जावाई,नाटवंड असा मोठा परिवार आहे🌟

नांदेड (दि.27 नोव्हेंबर 2024) : नांदेड येथील शीख समाजातील वयोवृद्ध महिला व सरदार नीलकमलसिंघ बुंगाई यांच्या आई जवालाकौर भ्र. स्व. अमरसिंघ बुंगाई यांचे बुधवारी दुपारी एक वाजता दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय 90 वर्षें होते. गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव स्व.अमरसिंघ बुंगाई यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे कुटुंबात एक मुलगा, सुन, पाच मुलीं, जावाई, नाटवंड असा मोठा परिवार आहे. 

त्यांच्या निधानाचे वृत्त कळल्याने स्थानीक शीख समाजातुन शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे राहते घर रामा सीटी, गुरूजी चौक, पावडेवाडी येथून बुधवारी सायंकाळी 5 वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच नगीनाघाट शमशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत समाजातील लोक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या